युद्धपातळीवर अवघ्या १२ तासांत वसई-विरार परिसरातील एक लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
- by
- Jul 10, 2026
वसई :- मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने अनेक ठिकाणी वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवला होता. पावसाचा जोर कमी होऊन पूरस्थिती ओसरल्यानंतर महावितरणने युद्धपातळीवर काम हाती घेत अवघ्या १२ तासांत दोन लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला असल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिली.
दि. ८ जुलैपासून पूराचे पाणी ओसरू लागताच महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी तातडीने कामाला लागले. अनेक ठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे होडीच्या साहाय्याने पाहणी करण्यात आली. पुरामुळे बाधित झालेल्या भूमिगत केबल, रोहित्र, वीजवाहिन्या व खांब यांची तपासणी करून आवश्यक तेथे तात्काळ दुरुस्ती व बदल करण्यात आला.
मुंबई मुख्य कार्यालयातील संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक मनुष्यबळ व साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले. मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी स्वतः वसई, नालासोपारा व विरार परिसरात प्रत्यक्ष भेटी देऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाचा सातत्याने आढावा घेतला.
मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एकूण ५२८ रोहित्रे पुराच्या पाण्यात बुडाली होती. त्यापैकी ६२ रोहित्रे पूर्णपणे निकामी झाल्याने ती तातडीने बदलण्यात आली. तसेच ९१ वीज खांब कोसळले होते. त्या ठिकाणी नवीन खांब उभारून वीजवाहिन्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. पुरात बुडालेल्या सर्व वीज उपकरणांची आवश्यक तांत्रिक तपासणी करूनच वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
महावितरणकडून वसई-विरार परिसरातील उर्वरित बाधित भागांमध्येही वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या संपूर्ण कामगिरी दरम्यान अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. तसेच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times