*घरोघरी जाऊन बीएलओ मार्फत मतदार माहिती संकलन कामाला वेग – ऑनलाईन गणनापत्र भरण्याचीही सुविधा*
- by
- Jul 10, 2026
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआर प्रोग्रम सुरू असून या अंतर्गत 30 जूनपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन गणनापत्रे भरून घेत आहेत. या कामाला आता वेग आला असून या कामासाठी नियुक्त बीएलओ यांचेमार्फत प्रत्येक नोंदीत मतदारास दोन प्रतींमध्ये गणनापत्र (Enumeration Form) देण्यात येत असून या गणनापत्रामध्ये माहिती भरून व स्वाक्षरी करून एक प्रत मतदारांनी बीएलओ यांचेकडे परत द्यायची आहे व दुसरी प्रत बीएलओची स्वाक्षरी घेऊन पोहोच म्हणून आपल्याकडे ठेवायची आहे.
बीएलओ या कामाकरिता 3 वेळा प्रत्येक घरी येणार असून काही कुटुंबातील पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यास त्यांना गणनापत्र ऑनलाईन भरण्याचीही महत्वाची सुविधा उपलब्ध आहे. सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबई शहरातील तंत्रस्नेही नागरिक या ऑनलाईन गणनापत्रे भरण्याला जास्तीत जास्त प्रतिसाद देतील अशा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याकरिता https://voters.eci.gov.in/ या सिटीझन सर्व्हिस पोर्टलवर जाऊन मतदार आपले गणनापत्र घरबसल्या ऑनलाईन भरू शकतात. ऑनलाईन गणनापत्र भरण्याची प्रक्रिया :
- भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी (https://voters.eci.gov.in)
- किंवा ‘Voter Helpline’ मोबाईल अॅप डाउनलोड करावे.
- नवीन नोंदणी/लॉगिन करून आवश्यक पर्याय निवडावा.
- “Enumeration Form / SIR” संबंधित सेवा निवडावी.
- आवश्यक वैयक्तिक व कुटुंबीय माहिती अचूकपणे भरावी.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत (ओळखपत्र, पत्ता पुरावा इ.).
- फॉर्म सबमिट करून अर्जाची पावती जतन करावी.
ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यास संबंधित BLO अधिकारी आवश्यक पडताळणीसाठी संपर्क साधतील, याची नोंद घ्यावी.
प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे मात्र ही मतदार यादीतील पुनरावृत्ती टाळून मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आपले नाव अंतिम मतदार यादीत राहण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपले नाव सन 2002 च्या मतदार यादीशी मॅपींग करून घेणे अत्यावश्यक आहे. सेल्फ मॅपींग व प्रोजिनी मॅपींगमध्ये यापूर्वीच ऐरोली व बेलापूर मतदारसंघातील 9,19,697 मतदारांपैकी 4,97,591 मतदारांचे मॅपींग पूर्ण झाले आहे, आता 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे मतदान केंद्र क्षेत्रातील घरोघरी जाऊन गणनापत्रांचे (Enumeration Form) दोन प्रतीत वितरण करीत आहेत. नागरिकांनी सदर गणनापत्रात आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी केलेली गणनापत्रे बीएलओ यांच्याकडे जमा करावयाची आहेत.
यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ज्यांचे नाव 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहे मात्र त्यावेळी वय कमी असल्याने सन 2002 च्या मतदार यादीत नाव समाविष्ट असणार नाही अशा मतदारांनी आपले आई /वडील / आजी / आजोबा यांचे सन 2002 च्या मतदार यादीत असलेले नाव, भाग क्र., मतदार क्रमांक ही माहिती https://electoralsearch.eci.
मात्र मतदाराचे किंवा त्याच्या आई/वडील/आजी आजोबा यांचे नांव सन २००२ चे मतदार यादीत नसेल तर त्याने आपल्या जन्म तारखेनुसार गणनापत्रात नमूद केलेली पुराव्याची कागदपत्रे सुनावणीच्या वेळेस जमा करावी लागतील.
बीएलओ यांच्यामार्फत 29 जुलैपर्यंत गणनापत्रे संकलित झाल्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असून 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
या प्रारूप मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश नसल्यास किंवा कोणाच्या नावाच्या समावेशाबाबत हरकत असल्यास मतदार नोंदणी अधिका-यांकडे याबाबत हरकती अथवा दावे 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. हे दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर हा असून दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे.
मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता व अद्ययावतपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार यादीत नाव राहण्यासाठी मतदाराचे मॅपींग होणे अत्यावश्यक आहे. योग्य मतदारांचीच नावे मतदारयादीत राहिल्याने मतदार यादी शुध्द होणार असून प्रत्येक नागरिकाने यामध्ये राष्ट्रीय जबाबदारी समजून सहभागी व्हावे तसेच सर्व सोसायट्यांच्या पदाधिका-यांनी आपल्या सोसायटीमध्ये बीएलओ यांना प्रवेश देऊन व त्यांना सर्व सदस्यांची गणनापत्रे भरून मिळण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी केले आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times