वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

भिवंडीत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू

  • by
  • Aug 01, 2026


भिवंडी: भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत) कोसळली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन ते तीन जण अडकल्याची शक्यता आहे. पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाचा इमारत कोसळली. भिवंडी अग्रिशमन दल, आपातकालीन व्यवस्था तसेच पोलिसांकडून बचावकार्य सुरु आहे. या इमारतीचं नाव कोहिनूर असून 12 ते 14 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे. या इमारतीला महापालिकेनं धोकादायकची नोटीस बजावली होती.

'जबाबदार लोकांवर गुन्हे दाखल करा'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच सी वन कैटेगिरीत असणाऱ्या इमारतीमधील लोकांना सक्तीने बाहेर काढण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

दुर्घटनेतील मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घटनेची माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या वतीने मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर कैली आहे. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आपत्तीच्या काळात प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

30 जुलै रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दख्यान घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष अग्रिशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी एनडीआरएफचे पथक व टीडीआरएफ दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने तोडून काढल्यानंतर दुर्घटग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट