वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे चालवा

  • by
  • Aug 08, 2026

खासदार डॉ. हेमंत सवरा यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

वसई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दरवर्षी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वसई रोड ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यासह पालघर जिल्ह्यातील रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे लाखो चाकरमानी आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव जवळ आला की कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू होते. अनेक प्रवाशांना आरक्षण मिळत नाही, तर काहींना मुंबईतील प्रमुख स्थानकांवरून प्रवास करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी वसई रोड ते सावंतवाडी रोड या मार्गावर १० ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दोन्ही दिशांनी विशेष गणेशोत्सव रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.

या विशेष रेल्वेगाड्या सुरू झाल्यास पालघर, वसई-विरार आणि परिसरातील प्रवाशांना थेट कोकणात जाण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या प्रमुख स्थानकांवरील गर्दीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

पालघर स्थानकावर अधिक एक्स्प्रेसना थांबा देण्याची मागणी

विशेष रेल्वेगाड्यांसोबतच पालघर रेल्वे स्थानकाला अधिक एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे मिळावेत, अशीही मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे.

बांदा टर्मिनस–उदयपूर सिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस दररोज सुरू करून तिला पालघर येथे थांबा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेस, दादर–अजमेर सुपरफास्ट, वांद्रे–गाझीपूर, मुंबई सेंट्रल–जयपूर आणि दौंड–इंदूर एक्स्प्रेस या गाड्यांनाही पालघर येथे व्यावसायिक थांबा देण्याची विनंती करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, प्रवाशांची वाढती संख्या आणि कोकण तसेच देशातील विविध भागांशी असलेली प्रवासाची गरज लक्षात घेता रेल्वे सुविधांचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे खासदार डॉ. सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट