गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश; २०० किलो मांसासह कार जप्त, तिघे अटकेत
- by
- Aug 11, 2026
पालघर : पालघर तालुक्यातील चहाडे गावात कथित गोवंश कत्तल आणि मांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे २०० किलो मांस, एक इको कार आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी रात्री चहाडे गावातील एका शेतातील घरात जनावरांची कत्तल करून मांसाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती काही कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर चहाडे गाव परिसरात लक्ष ठेवण्यात आले.
रविवारी पहाटे सुमारे दीडच्या सुमारास चहाडे गावातून एक इको कार वेगाने जाताना आढळली. संशय आल्याने तिचा पाठलाग करण्यात आला. पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच कारमधील व्यक्तींनी मासवण गावाच्या हद्दीतील दहिसर फाटा परिसरात कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढल्याचे सांगण्यात आले. यावेळी एका व्यक्तीला पकडण्यात आले.
दरम्यान, एका संशयास्पद दुचाकीचाही पाठलाग करण्यात आला. पालघर-मनोर मार्गावरील गोवाडे घाट परिसरात दुचाकी सोडून दोन जण जंगलाच्या दिशेने पसार झाले. दुचाकीची तपासणी केली असता जनावरांना गुंगी आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन आणि सुया आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर डायल ११२ वर संपर्क साधून पालघर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि कारवाई सुरू केली.
इको कारमध्ये आढळलेल्या मांसाचे नमुने पुढील तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी चहाडे गावातील संजय उर्फ पिट्या पाटील यांच्या शेतातील घराची पाहणी केली. यावेळी घराजवळ जनावरांचे अवशेष आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अटक केली असून, फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे तसेच पशुवैद्यकीय अहवालानंतर पुढील तपास करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times