विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार करिअरची दिशा; मेलजोलच्या 3E उपक्रमातून जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण
- by
- Aug 24, 2026
रोहा : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने गेल्या २६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या मेलजोल संस्थेच्या वतीने महानगर गॅस लिमिटेड (MGL) यांच्या सहकार्याने रोहा तालुक्यात ‘एकात्मिक जीवन कौशल्य, करिअर निवड आणि व्यवसाय मार्गदर्शन’ (3E) उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता, आवडी आणि स्वप्नांची ओळख करून घेत भविष्यातील शिक्षण, करिअर व व्यवसायाच्या योग्य संधी निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यामध्ये निर्णयक्षमता, आत्मविश्वास, संवादकौशल्य, ध्येय निश्चिती आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. बदलत्या काळातील शैक्षणिक व व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली जीवन कौशल्ये या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकसित केली जात आहेत.
स्वप्नांपासून करिअरच्या दिशेपर्यंत
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘My Dream – My Identity, Decision Making, 3Es Introduction, Goal Setting आणि Leadership’ या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. ‘My Dream – My Identity’ या सत्रातून विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख, आवडी-निवडी, क्षमता, कौशल्ये आणि भविष्यातील स्वप्ने यांचा विचार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि क्षमतेला अनुरूप करिअरची निवड कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
‘Decision Making’ या सत्रातून शिक्षण व करिअरचे विविध पर्याय समजून घेत योग्य निर्णय कसा घ्यावा, निर्णयाचे संभाव्य परिणाम कसे ओळखावेत आणि उपलब्ध माहितीचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
‘3Es Introduction’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रभावी संवाद आणि स्वतःची ओळख स्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला. भविष्यातील शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच मुलाखतीच्या प्रसंगी ही कौशल्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
‘Goal Setting’ या सत्रातून विद्यार्थ्यांना अल्पकालीन व दीर्घकालीन ध्येय निश्चित करणे, त्यासाठी नियोजन करणे आणि ठरवलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याचे महत्त्व समजावून देण्यात आले. तर ‘Leadership’ या घटकातून नेतृत्वगुण, संघभावना, जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सहकार्याने काम करण्याचे कौशल्य विकसित करण्यात आले.
अनुभवातून शिक्षणावर भर
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक पद्धतीने प्रशिक्षण न देता गटचर्चा, गटकाम आणि कृतीआधारित उपक्रमांच्या माध्यमातून अनुभवातून शिकण्याची संधी देण्यात आली. विविध व्यवसाय व करिअर क्षेत्रांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, स्थानिक पातळीवरील व्यवसायाच्या संधी समजाव्यात आणि स्वतःच्या आवडी व क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडता यावेत, यासाठी व्यवसाय मार्गदर्शनावरही विशेष भर देण्यात आला.
पाच शाळांचा सहभाग
महानगर गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने मेलजोलमार्फत सुरू असलेल्या या उपक्रमात रोहा तालुक्यातील पाच शाळांचा सहभाग आहे. यामध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सानेगाव; नगर परिषद रोहा शाळा क्र. १; नगर परिषद रोहा शाळा क्र. ९; नगर परिषद रोहा शाळा क्र. १० आणि पोटफोडे मास्टर माध्यमिक विद्यालय, खांब या शाळांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान, निर्णयक्षमता, संवादकौशल्य, ध्येय निश्चिती आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होत असून, त्यांना भविष्यातील शिक्षण, करिअर आणि व्यवसायाच्या विविध संधींची ओळखही करून दिली जात आहे.
महानगर गॅस लिमिटेडच्या सहकार्याने आणि मेलजोल संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला हा उपक्रम रोहा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याबरोबरच त्यांना २१व्या शतकातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सक्षम करणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times