रुस्तमजी क्राऊनमधील ९ सदनिकांवरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
- by
- Aug 27, 2026
महापालिकेची २४ आणि २५ ऑगस्ट रोजी धडक कारवाई; १३८ सदनिकांना बजावल्या होत्या नोटिसा
मुंबई : प्रभादेवी येथील रुस्तमजी क्राऊन इमारतीतील मंजूर आराखडा तसेच चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे व फेरबदलांविरोधात मुंबई महानगरपालिकेने धडक कारवाई केली. २४ आणि २५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ९ सदनिकांमधील अनधिकृत बांधकामे व फेरबदल निष्कासित करण्यात आले. कारवाई सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आठ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
रुस्तमजी क्राऊन या इमारतीतील अनधिकृत बांधकामे व फेरबदलांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने संबंधित सदनिकांची तपासणी केली. मंजूर आराखडा, एफएसआय तसेच बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर वैधानिक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
१३८ सदनिकांना नोटिसा
रुस्तमजी क्राऊन ही इमारत तीन तळघर, तळमजला आणि ६३ मजले अशा स्वरूपाची आहे. इमारतीतील काही मजले वाहनतळासाठी, १० वा व ११ वा मजला फिटनेस सेंटरसाठी, तर १३ वा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी राखीव आहे. १५ व्या ते ६३ व्या मजल्यांपर्यंत निवासी वापराची व्यवस्था आहे.
निवासी भागात ए, बी आणि सी अशा तीन विंगचा समावेश असून, संबंधित विंगना भोगवटा प्रमाणपत्र (OC) प्राप्त झाले आहे. निवासी विंगमध्ये मोठ्या संख्येने सदनिका आहेत.
इमारतीतील एफएसआय उल्लंघन, अनधिकृत बांधकामे आणि अंतर्गत फेरबदलांबाबत प्राप्त तक्रारींच्या आधारे संबंधित सदनिकांना मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) मधील संबंधित तरतुदींनुसार एकूण १३८ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
लॉबी, डक्ट आणि शाफ्टचा अनधिकृत वापर
महापालिकेच्या तपासणीदरम्यान काही सदनिकांमध्ये लॉबी, डक्ट आणि शाफ्टसारख्या सामायिक अथवा सेवा सुविधांसाठी असलेल्या जागांचा अनधिकृत वापर केल्याचे आढळून आले. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या साहित्याचा वापर करून जागा बंदिस्त करण्यात आल्या होत्या. तसेच स्वयंपाकघराचा भाग एमएस प्लेटच्या साहाय्याने बंदिस्त करून अतिरिक्त जागा तयार करण्यात आल्याचे, तर काही ठिकाणी डक्टचा स्टोरेजसाठी अनधिकृत वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
संबंधितांना बजावलेल्या नोटिसा आणि त्यानंतर पारित करण्यात आलेल्या कारणे दाखवा आदेशांच्या अनुषंगाने ही बांधकामे व फेरबदल अनधिकृत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कारवाई
महापालिकेकडून नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांना आवश्यक कागदपत्रे व स्पष्टीकरण सादर करण्याची तसेच आपले म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यात आली. संबंधितांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे, स्पष्टीकरणे आणि अभिलेखांची छाननी केल्यानंतर पात्र प्रकरणांमध्ये कारणमीमांसा असलेले आदेश (Speaking Orders) पारित करण्यात आले.
त्यानंतर वैधानिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि कारणमीमांसा आदेश पारित झालेल्या ९ सदनिकांमधील अनधिकृत बांधकामे व फेरबदलांविरोधात २४ आणि २५ ऑगस्ट रोजी निष्कासन कारवाई करण्यात आली. महापालिका कर्मचारी तसेच विद्युत निष्कासन यंत्रणेच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
उर्वरित प्रकरणांवरही कारवाई सुरू राहणार
रुस्तमजी क्राऊनमधील उर्वरित पात्र प्रकरणांमध्येही विहित वैधानिक प्रक्रिया राबवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंजूर आराखडा आणि बांधकाम नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर यापुढेही नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times