When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची कमाई; चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा ऐतिहासिक पराक्रम

  • by
  • Aug 27, 2026
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार आणि ५० हजार रुपये बक्षिस 

पनवेल : कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या कु. स्वस्तिका संदीप घोष हिने सुवर्णपदक पटकावून देशासह पनवेल आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या स्वस्तिकाने क्रीडा आणि शिक्षणाचा उत्कृष्ट समतोल साधत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे. स्वस्तिका घोष हिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २७ ऑगस्ट) तिचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी त्यांनी स्वस्तिकाच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर तिला ५० हजार रुपये बक्षिस दिले. 
         यावेळी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, जी. के. सुर्वे, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक तसेच स्वस्तिकाचे वडील आणि तिचे प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते. स्वस्तिका घोष ही लहानपणापासूनच टेबल टेनिसकडे आकर्षित झाली. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि खेळातील बारकावे आत्मसात करण्याची जिद्द या जोरावर तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. वेगवान हालचाली, आक्रमक शैली, अचूक फटके आणि प्रसंगावधान ही तिच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक सामन्यात आत्मविश्वासाने खेळ करत तिने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना स्वस्तिकाने आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा प्रभावी वापर केला. संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय टेबल टेनिसच्या भविष्यासाठी आशादायी चित्र निर्माण झाले असून, युवा खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
          विशेष म्हणजे, शिक्षण घेत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात यश मिळविणे ही स्वस्तिकाची कामगिरी कौतुकास्पद आहे. अभ्यास आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल राखत तिने विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. महाविद्यालयीन जीवनात मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करता येते, हे स्वस्तिकाने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. महाविद्यालयाच्या वतीने तिच्या क्रीडा कारकिर्दीला सातत्याने प्रोत्साहन देण्यात येत आहे.  स्वस्तिका घोषच्या सुवर्णयशामुळे पनवेलच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये पनवेलमधील युवा खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत असताना स्वस्तिकाच्या यशाने या वाटचालीला आणखी बळ मिळाले आहे. तिच्या मेहनतीची, जिद्दीची आणि यशाची प्रेरणा घेऊन अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
           कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून स्वस्तिका घोष हिने आपल्या महाविद्यालयाचा, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा, पनवेलचा तसेच महाराष्ट्र आणि देशाचा गौरव वाढविला आहे. तिच्या या देदिप्यमान कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.  “स्वस्तिकाचे यश हे पनवेलच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असून, तिच्या मेहनतीतून आणि जिद्दीतून युवा खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक मिळविणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा,” असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी स्वस्तिकाला शुभेच्छा देताना म्हटले. तर स्वस्तिकाला मिळालेले सुवर्णपदक जनार्दन भगत शिक्षण संस्थेला समर्पित करत असल्याची भावना, संदीप घोष यांनी व्यक्त केली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट