कवयित्री कविता मोरवणकर यांचे ‘लाडकी’ एकपात्री नाटक लवकरच रंगभूमीवर
- by
- Sep 28, 2026
मुंबई : सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका कविता मोरवणकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या आगामी ‘लाडकी’ या एकपात्री नाट्यप्रयोगाबद्दल माहिती दिली. कविता मोरवणकर यांच्या लेखणीतून साकारलेले आणि अरुण राधायन यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक **‘स्वयं दीप’**च्या निर्मितीतून रंगभूमीवर सादर होणार आहे. हा प्रयोग त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
कविता मोरवणकर या फुले-आंबेडकरी चळवळीशी एकरूप असलेल्या लेखिका असून, विद्रोही कवयित्री म्हणून त्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर अभिनय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी ‘अननोन फेस’ या स्वलिखित नाटकापासून अभिनयाला सुरुवात केली.
त्यानंतर युजिन आयोनेस्को लिखित आणि वृंदावन दंडवते अनुवादित ‘खुर्च्या’ या आभासी नाटकाचे त्यांनी सुमारे १८ प्रयोग केले. आता त्यांनी स्वतः लिहिलेले आणि अरुण राधायन यांनी दिग्दर्शित केलेले ‘लाडकी’ हे एकपात्री नाटक त्या रंगभूमीवर सादर करणार आहेत.
‘लाडकी’ या नाटकात जवळपास सलग दीड तास कविता मोरवणकर आपल्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांसमोर एक स्त्रीची कथा उभी करणार आहेत. आजची स्त्री स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत आहे. हा संघर्ष करताना स्त्रियांबद्दल समाजात रूढ झालेल्या रूढी-परंपरा आणि त्याबद्दलची सामाजिक मानसिकता यांचा विचार न करता, त्यांना कालबाह्य ठरवत स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणारी स्त्री अखेर विजयी होते, अशी या नाटकाची मांडणी आहे.
या नाटकातून स्त्रियांमध्ये जागृती आणि स्वत्वाची भावना निर्माण होणार असून, आजच्या प्रत्येक स्त्रीने हे नाटक पाहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जुनाट मानसिकता असलेल्या आणि नसलेल्या पुरुषांनीही हे नाटक पाहावे, असे सांगण्यात आले आहे.
‘लाडकी’चा प्रारंभिक प्रयोग सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे सादर होणार आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble