When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

जी.टी.बी. नगर पुनर्विकासाला गती; १ नोव्हेंबरपासून पात्र रहिवाशांना भाडे

  • by
  • Oct 08, 2026

१२०० निवासी सदनिकाधारकांना दरमहा २० हजार, तर पात्र व सशर्त पात्र अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांना दरमहा १० हजार रुपये भाडे म्हाडाकडून ३५६ अनिवासी गाळे व झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी सुधारित प्रारूप परिशिष्ट-२ प्रसिद्ध १२१ गाळेधारक पात्र, १९६ गाळेधारक सशर्त पात्र; पात्रता सिद्ध करण्यासाठी सहा महिन्यांची  मुदत

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२६ : म्हाडातर्फे बांधकाम व विकास करार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्पातील निष्कासित १,२०० निवासी सदनिकाधारकांना दरमहा २० हजार रुपये, तर पात्र ठरलेल्या १२१ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांना दरमहा १० हजार रुपये भाडे दि. ०१ नोव्हेंबर २०२६ पासून देण्यात येणार असून १९६ सशर्त पात्र धारकांनाही पुढील सहा महिन्यांचे भाडे अदा करण्यात येणार असल्याचे , आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांनी आज सांगितले. सशर्त पात्र गाळेधारकांना या सहा महिन्यांच्या कालावधीत संबंधित गाळेधारकांनी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करणे आवश्यक राहील, असे त्यांनी पुढे सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत C&D एजन्सीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाचा पहिला पुनर्विकास प्रकल्प आहे. जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्पातील गाळेधारक व झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेची प्रक्रिया राबविण्यात येत असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) ३५६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांसाठी सुधारित प्रारूप परिशिष्ट-२ (Re-draft Annexure-2) प्रसिद्ध केले आहे.

सुधारित प्रारूप परिशिष्ट-२ नुसार, ३५६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांपैकी १२१ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक पूर्णपणे पात्र, १९६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक सशर्त पात्र, तर ३९ धारक अपात्र ठरले आहेत. सशर्त पात्र ठरलेल्या गाळेधारकांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी पुढील सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पात्रता सिद्ध करणे संबंधित धारकांसाठी बंधनकारक राहणार आहे. सशर्त पात्र गाळेधारकांनी निर्धारित सहा महिन्यांच्या कालावधीत पात्रतेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हाडाकडे सादर करणे आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्रतेबाबत निर्णय घेण्यात येईल. याशिवाय, म्हाडाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेसाठी संबंधित गाळेधारकांनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाच्या (B.E.S.T.) प्रलंबित वीज देयकांची पूर्तता करणे देखील आवश्यक राहणार आहे.

पुनर्विकासाअंतर्गत १२०० लाभार्थ्यांकरिता तीन आधुनिक व आकर्षक निवासी टॉवर्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये ३९ ते ४८ मजल्यांच्या इमारती उभारण्याचे नियोजन आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) अन्वये फंजिबलसह किमान ४.५ चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील लाभर्थ्यांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक सोयोसुविधांयुक्त सदनिका विनामूल्य मिळणार आहे. गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकामास प्राधिकृत प्राधिकरणाकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (CC) प्राप्त झाल्यानंतर सर्व पात्र रहिवासी लाभार्थ्यांना दरमहा रुपये २०,००० इतके भाडे अदा करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी इमारतींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडातर्फे पार पाडण्यात येणार आहे. प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र गेटेड कम्युनिटी संकल्पनेनुसार या प्रकल्पात पारंपरिक रॅम्पद्वारे प्रवेशयोग्य बहुमजली बेसमेंट व पोडियम स्तरांवर वाहनतळाची सोय करण्यात आली आहे.


रिपोर्टर

  • Anoop chandrakant chavan
    Anoop chandrakant chavan (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Anoop chandrakant chavan

संबंधित पोस्ट