When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते सेवांचे उद्घाटन

  • by
  • Oct 14, 2026

'म्हाडा'तर्फे पाच कृत्रिम बुद्धिमत्ताधारित सेवांचा प्रारंभ

* शासकीय प्रक्रिया सुलभ होणार व नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा मिळणार

* आर्थिक ताळमेळ, दस्तऐवज व्यवस्थापन, भूखंडविषयक माहिती, नागरिक सेवा आणि ठरावांचा शोध अधिक सुलभ होणार

मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) प्रशासकीय कार्यक्षमता वाढविणे, शासकीय प्रक्रिया सुलभ करणे आणि नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI)आधारित पाच डिजिटल सेवांचा आज 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावेळी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल म्हणाले की, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (Government Process Re-engineering–GPR) आणि कार्यपद्धती सुधारणांच्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग आहे. सदर उपक्रमाचा उद्देश केवळ कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करणे नसून, प्रशासकीय प्रक्रियांच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे हा आहे. या सेवांमुळे पुनरावृत्तीच्या हाताळणीतील कामात कपात, प्रशासकीय प्रक्रिया आणि माहिती शोधण्याच्या वेळेत बचत, कामकाजातील अचूकता व सुसंगततेत वाढ, संस्थेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा अधिक प्रभावी वापर, नागरिकांना सेवा मिळविणे अधिक सुलभ होणे, नागरिकांच्या विनंत्या संबंधित विभागांकडे जलद पाठविणे, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व कार्यवाहीचा मागोवा घेण्याची सुविधा, भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ताधारित सुशासनासाठी भक्कम पायाभरणी होणार असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले. या पाच सेवांचा प्रारंभ हा म्हाडाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताधारित तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा 'म्हाडा'चा प्रयत्न असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.

   कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI)आधारित म्हाडातील पाच डिजिटल सेवा 

१. एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र (Unified Citizen Facilitation Centre – CFC)

म्हाडातर्फे नागरिक सुविधा केंद्र (CFC) सुरू करण्यात आले असून नागरिकांना घरबसल्या म्हाडातील संबंधित अधिकारी, विभागाकडे पत्र, निवेदने, कागदपत्रे पाठवण्यासाठी CFC@home ही सुविधा काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. सदर सुविधेत आणखी सुधारणा करून CFC @home मध्ये अर्जदारांसाठी AI आधारित दस्तऐवजाची छाननी सुविधा विकसित करण्यात आली आहे. सदर सुविधेद्वारे अर्जदाराने अपलोड केलेल्या कागदपत्रांचे विश्लेषण करून, संबंधित असलेल्या संभाव्य तीन अधिकारी, विभागांचे पर्याय अर्जदारास सुचवण्यात येतील. या सुविधेमुळे अर्जदारास योग्य अधिकारी, विभागाची निवड करणे सुलभ होऊन कागदपत्रे योग्य त्या ठिकाणी पाठवण्याची प्रक्रिया अधिक अचूक व जलद होण्यास मदत होणार आहे. तसेच अर्जदारास कोणत्या अधिकारी, विभागास पत्र पाठवावे याबाबत माहिती नसल्यास Not known हा पर्याय निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सदर पर्याय निवडल्यानंतर संबंधित कागदपत्रे नागरिक सुविधा केंद्र पोर्टलवर प्राप्त होणार असून त्यानंतर नागरिक सुविधा केंद्रात नियुक्त करण्यात आलेल्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सदर कागदपत्रे संबंधित अधिकारी, विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.   

     म्हाडाच्या डिजिटल सेवांशी एकात्मिक केलेल्या या सुविधेद्वारे नागरिकांना संवादात्मक माध्यमातून ई-ऑफिस प्रणालीतील पत्रांच्या स्थितीची माहिती जाणून घेता येईल. तसेच, ऑनलाइन नागरिक सुविधा केंद्राकडे प्राप्त झालेल्या विनंत्यांसाठी संबंधित विभाग आणि जबाबदार अधिकाऱ्याची ओळख पटविण्यास कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होईल. आपण पाठविलेले पत्र, निवेदन, कागदपत्रे कुठल्या अधिकारी,विभागाकडे कुठल्या टप्प्यावर आहेत याची माहिती अर्जदाराला ई-ऑफिस क्रमांकाने ट्रॅक करता येणार आहे.    

--

२. आर्थिक ताळमेळ प्रणाली (Finance Reconciliation Engine)

म्हाडाच्या विविध विभागीय मंडळातील लेखा व वित्त विभागाला या प्रणालीच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट, आरटीजीएस (RTGS) व्यवहार आणि रोकडवहीतील नोंदी यांचा ताळमेळ साधण्यास मदत होणार आहे. प्रणालीद्वारे जुळणाऱ्या व्यवहारांची स्वयंचलित ओळख केली जाईल, तर जुळणी न झालेल्या नोंदींची पडताळणी संबंधित वित्त विभागाला करता येईल. त्यामुळे हाताने कराव्या लागणाऱ्या कामात कपात होऊन आर्थिक नोंदींची अचूकता वाढण्यास मदत होईल.

३. फाइल नामकरण व टॅगिंग प्रणाली (Files Naming & Tagging)

सदर दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीद्वारे अपलोड केलेल्या फाइल्सचे स्वयंचलित वर्गीकरण व टॅगिंग म्हाडातील अधिकारी- कर्मचारी यांना करता येईल. फाइल्सना प्रमाणित पद्धतीने नावे देणे, आवश्यक दस्तऐवजांचा जलद शोध घेणे आणि ते सहज उपलब्ध करून घेणे शक्य होईल. याशिवाय, दस्तऐवजांचा सारांश मराठी व इंग्रजी भाषेत तयार करणे आणि सुरक्षित पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करणेही शक्य होणार आहे.

४. भूखंडविषयक माहितीसाठी आभासी सहाय्यक (Virtual Assistant for Land Queries)

म्हाडाच्या भौगोलिक माहिती प्रणालीशी (GIS) संलग्न असलेल्या या कृत्रिम बुद्धिमत्ताधारित आभासी सहाय्यकाद्वारे वापरकर्त्यांना संवादात्मक पद्धतीने उपलब्ध भूखंडविषयक माहिती म्हाडातील अधिकारी- कर्मचारी यांना मिळविता येईल. त्यामुळे गुंतागुंतीच्या GIS नोंदींमध्ये स्वतः शोध घेण्याची आवश्यकता कमी होऊन संबंधित माहिती सहज उपलब्ध होईल.


५. ठराव शोध व संलग्नता प्रणाली (Resolution Extraction & Linking)

सदर प्रणालीद्वारे म्हाडाच्या बैठकींच्या दस्तऐवजांमधील यापूर्वी झालेले ठराव शोधून त्यांचे अनुक्रमणिका पद्धतीने वर्गीकरण केले जाईल. ठराव क्रमांक, विषय किंवा संबंधित माहितीच्या आधारे ठराव अधिकारी- कर्मचारी यांना शोधता येतील. तसेच, मूळ दस्तऐवजातील संबंधित पान किंवा विभाग थेट उघडता येईल. त्यामुळे आवश्यक ठरावांचा शोध घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट