When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पालघरमधील चार आदिवासी निवासी शाळांमध्ये स्नेह आशा फाउंडेशनतर्फे १२ आठवड्यांच्या ‘जीवन कौशल्य’ प्रकल्पाचा शुभारंभ

  • by
  • Oct 14, 2026

आर्थिक व्यवस्थापनापासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आकलनापर्यंत; पालघरमधील आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडील कौशल्यांचे धडे देणार स्नेह आशा फाउंडेशन

पालघरमधील चार आदिवासी निवासी शाळांमध्ये स्नेह आशा फाउंडेशनतर्फे १२ आठवड्यांच्या ‘जीवन कौशल्य’ प्रकल्पाचा शुभारंभ; फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमांचा एकूण लाभ १६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत

पालघर : आर्थिक साक्षरता, इंग्रजी संवादकौशल्य, डिजिटल शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) ओळख यांसारखी जीवनोपयोगी कौशल्ये आता पालघरमधील आदिवासी विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत. स्नेह आशा फाउंडेशनतर्फे विक्रमगड आणि जव्हार तालुक्यांतील चार आदिवासी निवासी शाळांमध्ये १२ आठवड्यांच्या ‘जीवन कौशल्य’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत शाळकरी मुलींना ५५ सायकलींचे वितरणही करण्यात आले.

मुलांना भविष्यासाठी सक्षम बनवण्यासाठी नेमके काय आवश्यक आहे? पाठ्यपुस्तके आणि परीक्षांपलीकडे जाऊन मुलांना पैशांचे व्यवस्थापन, आत्मविश्वासाने संवाद साधणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगाला समजून घेणे यांसारखी कौशल्ये आत्मसात करणेही आवश्यक आहे.पालघरमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासात आता या महत्त्वपूर्ण कौशल्यांचाही समावेश होणार आहे. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये, आर्थिक साक्षरता, व्यवहारोपयोगी इंग्रजी, डिजिटल साक्षरता आणि करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. विक्रमगड आणि जव्हार तालुक्यांतील चार आदिवासी निवासी शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, अशा संधींपासून अनेकदा वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि नव्या संधींची ओळख करून दिली जाणार आहे.

या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा विक्रमगड येथील एस. के. ॲग्रो टुरिझम येथे पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे ४०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रसिद्ध आदिवासी लोककलावंत आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त भिकल्या लडक्या धिंडा बाबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा श्रीमती सिद्धी चौहान जयस्वाल यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमात पालघरच्या समृद्ध आदिवासी सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्यात आले. भिकल्या लाडक्या धिंडा बाबा यांनी पारंपरिक तारपा कलेचे सादरीकरण केले, तर जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी लोकनृत्ये आणि स्थानिक कलाप्रकार सादर केले. आधुनिक शिक्षण आणि नव्या संधींची दारे खुली करताना पारंपरिक संस्कृती, कला आणि स्थानिक अस्मिता जपण्याचे महत्त्व या सादरीकरणांतून अधोरेखित झाले.

यावेळी बोलताना पद्मश्री पुरस्कारप्राप्त भिकल्या लाडक्या धिंडा बाबा म्हणाले, “आदिवासी भागातील मुलांमध्ये खूप क्षमता आहे. त्यांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या, तर ती स्वतःचं भविष्य घडवू शकतात आणि स्वावलंबी बनू शकतात. त्यासाठी त्यांना योग्य आधार देणं गरजेचं आहे.”

‘जीवन कौशल्य’ प्रकल्पांतर्गत शाळकरी मुलींना ५५ सायकलींचे वितरण करण्यात आले. शिक्षण आणि संधींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची उपलब्धता महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. पालघरच्या आदिवासी भागात शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठीचे अंतर अनेकदा शिक्षण सुरू ठेवण्यात आणि कौशल्यविकासात अडथळा ठरू शकते. सायकलींमुळे मुलींना शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींपर्यंत अधिक स्वावलंबीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. जीवनोपयोगी कौशल्यांचे शिक्षण देण्यासोबतच त्या कौशल्यांचा प्रत्यक्ष उपयोग करण्यातील अडथळे दूर करणेही आवश्यक आहे, या विचारातून सायकल वितरण करण्यात आले.

जीवनभर उपयोगी पडणाऱ्या कौशल्यांचे शिक्षण

पारंपरिक शिक्षणातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान मिळते; मात्र दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि भविष्याविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी व्यावहारिक कौशल्येही आवश्यक असतात.

ही गरज लक्षात घेऊन ‘जीवन कौशल्य’ प्रकल्पांतर्गत आर्थिक साक्षरता, व्यवहारोपयोगी इंग्रजी, जीवनोपयोगी कौशल्ये, संवाद व व्यक्तिमत्त्व विकास कौशल्ये आणि करिअरसाठीची तयारी या पाच प्रमुख क्षेत्रांवर भर देण्यात येणार आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना बचत आणि पैशांचे व्यवस्थापन, प्रभावी संवाद, सांघिक कार्य, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि समस्या सोडविण्याची कौशल्ये शिकविण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संवादात्मक चर्चा, खेळ, गटचर्चा, सामूहिक उपक्रम आणि प्रत्यक्ष कृतींवर आधारित शिक्षणपद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि करिअरच्या विविध संधींबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. आधुनिक जगातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्यांची तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मूलभूत संकल्पनांची ओळख करून दिली जाणार आहे.

विक्रमगड तालुक्यातील करहे आणि कुर्जे येथील निवासी शाळा तसेच जव्हार तालुक्यातील डाभोसा आणि विनवळ येथील निवासी शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत शिक्षक, पालक, शाळा प्रशासन आणि स्थानिक समुदायाचाही सहभाग घेतला जाणार आहे.

“मुलांच्या क्षमता त्यांच्या परिस्थितीमुळे मर्यादित होता कामा नयेत” : श्रीमती सिद्धी चौहान जयस्वाल

या प्रकल्पाविषयी बोलताना स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा श्रीमती सिद्धी चौहान जयस्वाल म्हणाल्या,“प्रत्येक मुलामध्ये स्वप्ने पाहण्याची, जिज्ञासू राहण्याची आणि आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण साध्य करण्याची क्षमता असते. मात्र, प्रत्येकाला समान संधी मिळतातच असे नाही. आदिवासी गावात वाढणाऱ्या मुलालाही महानगरातील मुलाप्रमाणेच तंत्रज्ञान समजून घेण्याची, आर्थिक कौशल्ये शिकण्याची, आत्मविश्वासाने संवाद साधण्याची आणि करिअरच्या विविध संधींचा शोध घेण्याची समान संधी मिळायला हवी.

‘जीवन कौशल्य’ प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या मुलांपर्यंत अशा संधी पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यश मिळवून देणे एवढाच मर्यादित नसावा. विद्यार्थ्यांना निर्णय घेता यावेत, आव्हानांवर मात करता यावी आणि स्वावलंबी, समृद्ध जीवन घडविता यावे, यासाठीही शिक्षणाने त्यांना तयार केले पाहिजे. या परिवर्तनात योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत तळागाळातील गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न

पालघर दौऱ्यादरम्यान सिद्धी चौहान जयस्वाल यांनी कुर्जे निवासी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी, मुख्याध्यापिका आणि शिक्षकांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अनुभव, आकांक्षा आणि त्यांच्यासमोरील आव्हाने जाणून घेतली. तसेच फाउंडेशनतर्फे शिक्षण, डिजिटल साक्षरता, शिष्यवृत्ती आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीविषयी चर्चा केली.

वंचित घटकांतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये व्यक्ती आणि विविध संस्थांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.१६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली शैक्षणिक चळवळ

‘जीवन कौशल्य’ प्रकल्पाचा शुभारंभ हा विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण शैक्षणिक संधी निर्माण करण्याच्या स्नेह आशा फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पालघरमधील ‘जीवन कौशल्य’ या नव्याने सुरू केलेल्या प्रकल्पासह फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा एकूण लाभ १६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतील ५४ शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय, फाउंडेशनतर्फे आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये ७२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्यात आली आहे.

पालघरमधील विद्यार्थ्यांसाठी जीवनोपयोगी कौशल्ये, आर्थिक साक्षरता, इंग्रजी संवादकौशल्य आणि करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून फाउंडेशन शैक्षणिक यशासोबतच भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याच्या दिशेने काम करत आहे.

स्नेह आशा फाउंडेशनविषयी

स्नेह आशा फाउंडेशन ही सिद्धी जयस्वाल आणि स्नेहा जयस्वाल यांनी स्थापन केलेली मुंबईस्थित ना-नफा तत्त्वावर कार्यरत संस्था आहे. वंचित घटकांतील मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था डिजिटल शिक्षण, शिष्यवृत्ती, जीवनोपयोगी कौशल्ये, आर्थिक साक्षरता आणि करिअर विकास अशा विविध क्षेत्रांत काम करते.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालघरमधील ‘जीवन कौशल्य’ प्रकल्पासह फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ १६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास, व्यावहारिक कौशल्ये आणि स्वतःची स्वप्ने साकार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे.

सिद्धी चौहान जयस्वाल यांच्याविषयी

सिद्धी चौहान जयस्वाल या स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा आहेत. वंचित घटकांतील मुलांसाठी शैक्षणिक संधींचा विस्तार करणे, विशेषतः डिजिटल साक्षरता, शिष्यवृत्ती, जीवनोपयोगी कौशल्ये आणि करिअरसाठीची तयारी या क्षेत्रांत काम करणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

उंडेशनच्या माध्यमातून त्या शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्ये, आत्मविश्वास आणि दीर्घकालीन वैयक्तिक विकासाच्या संधी यांचा समन्वय साधणाऱ्या शिक्षणपद्धतीला प्रोत्साहन देत आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट