रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद
- by
- Nov 08, 2026
रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद
सौरभ मित्र मंडळाचा अन्नमित्रच्या माध्यमातून ४०० रुग्ण आणि गरजूंना फराळ भेट; ७५ महिलांना साड्यांचेही वाटप
मुंबई , दि.८ - कुणाची दिवाळी पहाट सूर-तालांच्या साथीने उजळत होती, कुणी मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या भेटीगाठींत रमलं होतं, तर कुणाच्या घरी फराळाची लगबग सुरू होती. मात्र, याचवेळी सौरभ मित्र मंडळाचे कार्यकर्ते टाटा आणि केईएम रुग्णालय परिसरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि गरीब-गरजूंना दिवाळीचा आनंद देण्यासाठी धडपडत होते. अन्नमित्र सत्कार्याच्या माध्यमातून मंडळाने माणुसकीचा दीप उजळत ४०० हून अधिक जणांना एक किलो वजनाचे दिवाळी फराळाचे डबे भेट दिले. तसेच ७५ गरजू महिलांना साड्यांचे वाटप केले.
घरातील एखादी व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली की संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य रुग्णालयाभोवती फिरू लागते. उपचारांची चिंता, आर्थिक विवंचना आणि रुग्णाच्या प्रकृतीची काळजी यांत सण-उत्सवाचा आनंद हरवून जातो. टाटा आणि केईएम रुग्णालय परिसरात असे शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दिवाळीपासून दूर असतात. अशा कुटुंबांच्या आयुष्यात थोडासा गोडवा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या सत्कार्यामागे अनेक दात्यांचे आर्थिक सहकार्य, कार्यकर्त्यांची मेहनत आणि माणुसकीची भावना होती. अन्नमित्र संजय सोमनाथ शेटये यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी १५० फराळाच्या भेटींपासून सुरू झालेला हा प्रवास यंदा ४०० चा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. दात्यांची वाढती संख्या आणि सहकाऱ्यांचे प्रोत्साहन यामुळे मंडळाचा उत्साहही वाढत आहे.
या उपक्रमासाठी सान्वी पेडणेकर, सौ. आशालता खानोलकर, कु. नुपूर खानोलकर, प्रल्हाद गवरे, उज्वला गवरे, अशोक गोरीवले, सुलभा गोरीवले, विपुल छेडा, संजय मीना, सुनिता कोटियन, प्रसाद कोरगावकर, जोत्स्ना गुप्ते, दिलीप कदम, मनमोहन निंबाळकर, सत्तार शेख आणि सौ. कल्पना वारिया यांनी फराळ भेटीसाठी मदतीचा हात दिला.
दानाची रक्कम किती मोठी, यापेक्षा त्यामागची भावना मोठी असते. आपल्या आनंदात गरजूंनाही सहभागी करून घेण्याच्या या उपक्रमात आणखी संवेदनशील दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सौरभ मित्र मंडळाचे सरचिटणीस मंगेश वरवडेकर यांनी केले आहे. आपली दिवाळी तेव्हाच खऱ्या अर्थाने गोड होते, जेव्हा आपल्या आनंदाचा थोडासा गोडवा दुसऱ्याच्याही आयुष्यात उतरतो. हेच या सत्कार्याच्या माध्यमातून दिसून आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble