स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांची कल्पकता लक्षवेधी; अवघ्या महिनाभरात विकसित केलेल्या ॲपचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनकडून नवी मुंबईला पसंती देत 'सेंटर ऑफ एक्सलन्स' प्रकल्पाबाबत विचारविनीमय

  • by
  • Nov 20, 2026

    र्जेंटिना फुटबॉल असोसिएशनकडून नवी मुंबईला पसंती देत 'सेंटर ऑफ एक्सलन्स' प्रकल्पाबाबत विचारविनीमय

     

    नवी मुंबईतील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता, आधुनिक स्वरूपाचे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि फुटबॉल विकासासाठी पोषक असलेले वातावरण लक्षात घेऊन अर्जेंटिनाच्या फुटबॉल असोसिएशनने (AFA) भारतातील आपल्या प्रस्तावित फुटबॉल विकास उपक्रमासाठी नवी मुंबईला प्राधान्य दिले आहे.

    या अनुषंगाने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या विशेष प्रतिनिधी मंडळाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देऊन या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेसोबत सहयोगाने काम करण्याची तयारी दर्शविली आणि पुढील सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

    यावेळी उपमहापौर श्री.दशरथ भगत, सभागृह नेता श्री.सागर नाईक, क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे तसेच अर्जेंटिनाचे उप-वाणिज्यदूत इझेक्विएल एम. चाबाय आणि जोएल बालेजोस व एएफएचे प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते.

    यावेळी 'सेंटर ऑफ एक्सलन्स' या संकल्पनेच्या माध्यमातून अर्जेंटिनामधील प्रगत फुटबॉल प्रशिक्षण पद्धती, त्याविषयी शिस्त, मूल्ये आणि समृद्ध फुटबॉल संस्कृती ही नवी मुंबईतील शाळा व फुटबॉल अकादमींपर्यंत कशा पध्दतीने पोहोचविण्यात येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती आणि भविष्यातील व्याप्ती यासोबतच नवी मुंबईतील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या स्वरूपात नियोजन करता येईल यावर सभागृह नेते श्री.सागर नाईक यांनी विस्तृत चर्चा केली.

    या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाला संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर रूपरेषा, अंमलबजावणीची कार्यपद्धती, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याचे स्वरूप यांचा समावेश असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून प्रकल्पाच्या पुढील दिशा, नियोजन आणि कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

    नवी मुंबईच्या क्रीडा विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून शहरातून विविध खेळांतील गुणवंत खेळाडू तयार व्हावेत व त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिध्द करावी व नवी मुंबई शहराचा नावलौकिक उंचवावा हा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे व त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. 

    रिपोर्टर

    • The Global Times
      The Global Times (Admin)

      Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

      The Global Times

    संबंधित पोस्ट