से.11 कोपरखैरणे नमुंमपा शाळेस माजी महापौर कै.तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय नामकरण संपन्न
- by
- Nov 20, 2026
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 11 येथील नमुंमपा सी.बी.एस.ई. शाळा क्र.94 या शाळेस माजी महापौर कै.तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय असा नामकरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी माजी खासदार श्री.संजीव नाईक, माजी आमदार श्री.संदीप नाईक, उपमहापौर श्री.दशरथ भगत, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृहनेते तथा स्थानिक नगरसेवक श्री.सागर नाईक, माजी महापौर नगरसेवक श्री.जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.चंद्रभागा मोरे, पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, स्थानिक नगरसेवक श्री.मुनावर पटेल, श्रीम.वैष्णवी नाईक, श्रीम.अदिती नाईक, श्री.संदीप म्हात्रे, श्री.डी.आर.पाटील, श्री.शिरीष पाटील, श्रीम.मिनाक्षी पाटील, माजी नगरसेवक श्री.लिलाधर नाईक, श्री.शंकर मोरे आणि श्री.वैभव नाईक तसेच परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे, कोपरखैरणे विभागाच्या सहा.आयुक्त श्रीम.साधना पाटील, शिक्षणाधिकारी श्री.अशोक कडुस, जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र कोंडे, उपअभियंता श्री. संतोष शिकतोडे व इतर मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका श्रीम.वैष्णवी वैभव नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सभागृहनेते तथा स्थानिक नगरसेवक श्री. सागर नाईक यांनी मांडलेल्या नामकरण प्रस्तावानुसार महापालिका सर्वसाधारण सभेच्या मंजूरीने सदर नामकरण संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या जडणघडणीत अगदी सुरूवातीपासून माजी महापौर श्री.तुकाराम नाईक यांचे अत्यंत मौलिक योगदान राहिले आहे. महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून 1998-99 मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत सन 1999-2000 मध्ये नवी मुंबई शहर विकासाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषवित त्यांनी नवी मुंबईमध्ये राज्यातील सर्व शहरांच्या महापौरांचे राज्यस्तरीय अधिवेशन भरविले होते. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कौपरखैरणे सेक्टर 11 येथील शाळेला कै.तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय असे नामकरण करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Tusshar Kapoor
- जन्मदिन
- November 20
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times