संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन *26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, जवान व निरपराध नागरिकांना श्रद्धांजली*
- by
- Nov 26, 2026
संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे महापौर महोदयांसमवेत सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, मुख्य लेखा परीक्षक श्री. राजेंद्र गाडे, उपआयुक्त श्री.सुखदेव येडवे, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव, शिक्षणाधिकारी श्री. अशोक कडुस व इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्विकृत करुन 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत संविधान महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्या अनुषंगाने आज संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे महापौर श्रीम. सुजाता पाटील यांचे समवेत अधिकारी, कर्मचारीवृंदाने सामुहिक वाचन केले.
यावेळी 26 /11/ 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, भारतीय सैन्यदलातील जवान, निरपराध नागरिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
आज संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या शाळांमध्येही संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले, तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘घरोघरी संविधान’ उपक्रम सर्वत्र उत्साहात राबविण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Arjun Rampal
- जन्मदिन
- November 26
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times