..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मांडूळ सापाची तस्करी करणारे जेरबंद

पनवेल : पनवेलमध्ये मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून 15 लाख रुपये किमतीच्या सापाची सुटका केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गणेश पद्माकर पाटील (पेण), नीलेश जनार्दन बाइंग (उरण) व आविष्कार गणेश म्हात्रे (उरण) यांचा समावेश आहे.

मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य प्राप्त होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. यामुळे या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. 25 ऑगस्टला पनवेल एसटी डेपोच्या मागील बाजूला सर्व्हिस रोडवर तीन जण सापाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे यांना मिळाली होती. गुन्हे शाखा युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवसे, सुनील सावंत, वनविभागाचे सिद्धेश अभिमान मोराळे व सुभाष किशोर राठोड यांनी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड परिसरामध्ये सापळा रचला होता. 7.30 वाजण्याच्या सुमारास येथील पाण्याच्या टाकीजवळ तीन जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यापैकी गणेश पाटीलकडील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये अडीच किलो वजनाचा व 43 इंच लांबीचा मांडूळ साप आढळून आला. 15 लाख रुपयांना हा साप विकण्यात येणार होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तिघांविरोधात बेकायदेशीरपणे साप पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट