..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

एनएमएमटीची उरण बससेवा बंद होणार

उरण ः नवी मुंबई ते उरण ही बससेवा 1 डिसेंबरपासून तात्पुरती बंद करण्याचा निर्णय नवी मुंबई परिवहन उपक्रमाने घेतला आहे. याची माहिती एका पत्राद्वारे उरण नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिली आहे. नगरपालिकेकडून आवश्यक सुविधा मिळत नसल्याचे कारण देण्यात आले आहे.

उरणमधील प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. ही सेवा पूर्ववत सुरू राहावी अशी आग्रही मागणी केली आहे. उरण हा नवी मुंबईचाच एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा ही येथील नागरिक, विद्यार्थी तसेच चाकरमान्यांसाठी लाइफलाइन ठरली आहे. उरण तालुक्यात होत असलेल्या औद्योगिकीकरणाबरोबरच नागरीकरणातही वाढ झाली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या एनएमएमटी या परिवहन सेवेच्या बसेस उरण ते नवी मुंबई तसेच तळोजा, कळंबोली, बेलापूर आदी ठिकाणी प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. बसेसची संख्या जादा असल्याने प्रवाशांना वेगाने प्रवास करता येत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून उरण शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू असल्याने एनएमएमटीचे स्थानक शहरातील पेन्शनर्स पार्क’ याऐवजी चारफाटा ओएनजीसी उरण येथे शहराबाहेर हलविले आहे. या ठिकाणी बसेस उभ्या करण्यात तसेच त्या फिरविण्यास अडथळे निर्माण होत असल्याने ही सेवा तात्पूर्ती खंडित केली जात असल्याचे पत्र उरण नगरपालिकेला देण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट