एनएमएमटीची उरण बससेवा बंद होणार
उरण ः नवी मुंबई ते उरण ही बससेवा 1 डिसेंबरपासून तात्पुरती बंद करण्याचा निर्णय नवी मुंबई परिवहन उपक्रमाने घेतला आहे. याची माहिती एका पत्राद्वारे उरण नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिली आहे. नगरपालिकेकडून आवश्यक सुविधा मिळत नसल्याचे कारण देण्यात आले आहे.
उरणमधील प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. ही सेवा पूर्ववत सुरू राहावी अशी आग्रही मागणी केली आहे. उरण हा नवी मुंबईचाच एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा ही येथील नागरिक, विद्यार्थी तसेच चाकरमान्यांसाठी लाइफलाइन ठरली आहे. उरण तालुक्यात होत असलेल्या औद्योगिकीकरणाबरोबरच नागरीकरणातही वाढ झाली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या एनएमएमटी या परिवहन सेवेच्या बसेस उरण ते नवी मुंबई तसेच तळोजा, कळंबोली, बेलापूर आदी ठिकाणी प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. बसेसची संख्या जादा असल्याने प्रवाशांना वेगाने प्रवास करता येत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून उरण शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू असल्याने एनएमएमटीचे स्थानक शहरातील पेन्शनर्स पार्क’ याऐवजी चारफाटा ओएनजीसी उरण येथे शहराबाहेर हलविले आहे. या ठिकाणी बसेस उभ्या करण्यात तसेच त्या फिरविण्यास अडथळे निर्माण होत असल्याने ही सेवा तात्पूर्ती खंडित केली जात असल्याचे पत्र उरण नगरपालिकेला देण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times