कमी खर्चात प्रभावी उपचार : नवी मुंबई, ऐरोली येथे सहयोग होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्घाटन. कामोठे मध्ये रेल्वे स्थानक परिसर व अग्निशमन दलासाठी राखीव प्लाॅट वरती अतिक्रमणाविरोधी कारवाई Kavach Commissioned of in Prayagraj – Kanpur Section of NCR २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे जागतिक झुकाव वेगाने; वाहन उद्योगात मोठा बदल डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

आयुक्तांनी केली नागरी कामांची पाहणी

पनवेल : पालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्त्याची कामे, मुख्यालयासमोरील देवाळे तलावाचे सुशोभीकरण, बंदर रस्त्यावरील एसटीपी प्लॅन्ट, वडाळे तलावाच्या प्रस्तावीत सुशोभीकरणाची जागा, पालिका शाळा, पनवेल येथील मच्छीमार्केट तसेच शहरातील ड्रेनेज व्यवस्थेची आदी विकासकामांची पनवेल पालिका आयुक्तांनी बुधवारी पाहणी केली. शहर सुंदर आणि स्वच्छ कसे बनेल याचा आढावा आयुक्तांनी अधिकार्‍यांसोबत केलेल्या दौर्‍यात घेतला. तसेच नागरिकांशी सुसंवाद साधत भविष्यातील पनवेल शहर कसे असावे हे जाणून घेतले..

कचरासेवेसाठी लागणारी वाहने आणि कचराकुंडी खरेदीसाठी लागणारा जवळजवळ 22 कोटी खर्च करून आता पालिकेच्या ताफ्यात नवीन 71 वाहने आली असून लवकरच दोनशेच्या आसपास कचराकुंड्यांचा समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण आणि दुरुस्तीसाठी 23 कोटींच्या कामाची सर्व प्रक्रिया पार पडली असून काही ठिकाणी कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी सुरू होणार आहेत. .

यामध्ये प्रामुख्याने शहरातील वरदविनायक सोसायटी ते बिरमोळे हॉस्पिटल, परदेशी आळी, महाराणा प्रताप मार्ग, मौलाना आझाद चौक ते कोळीवाडा (5 कोटी 16 लाख), मिडल क्लास सोसायटी उन्नतीकरण, नंदनवन सोसायटीसमोरील रस्ता, ओरियन मॉलच्या पाठीमागील रस्ता, टिळक रोड (2 कोटी 12 लाख), रिलायन्स फ्रेश ते आशियाना, मिडल क्लास सोसायटीमधील रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण (8 कोटी 56 लाख), गांधी हॉस्पिटल ते एनएच 4 स्व्हिहस रोडचे कॉँक्रिटीकरण व पावसाळी गटार आणि पदपथ दुरुस्ती (1 कोटी 64 लाख), मुंबई हायवे ते मार्केट यार्ड, लाईन आळी शिवाजी महाराज रस्ता (1 कोटी 25 लाख) यासह पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात टेक्नोव्हा ते कोयनावेळे, तळोजा-कल्याण एमआयडीसी रस्ता ते नागझरी पाडा, वावंजे ते पालेखुर्द, बौद्धवाडा (रोडपाली), पडघे गाव, रोहिंजण ते पिसार्वे, तुर्भेमार्गे करवलेपर्यंत रस्ता दुरुस्त करणे (4 कोटी 47 लाख), मुंब्रा हायवे ते धरणा कॅम्प, महामार्ग 4 ते धानसर, घोट कॅम्प ते तळोजे फेज 2, कोयनावेळे ते एमआयडीसी 2 कोटी 91 लाख, तळोजा पाचनंद येथील शिराज पटेल बंगलो ते तलाव, जुई गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती, मुंब्रा हायवे ते फरशी पाडा ब्रिज तळोजा पाचनंद आणि मुंब्रा हायवे ते अकस्सा मशीद (4 कोटी 74 लाख) आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. .

यामध्ये प्रामुख्याने स्वामी हॉटेल ते अमरधाम येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून मिडलक्लास हौसिंग सोसायटीमध्ये नव्याने रस्ता बनवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. .

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देश झोपडपट्टीमुक्त असावा, असे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्यामुळे शहरातील जुन्या 26 झोपडपट्ट्यांचा सर्वे पूर्ण करण्यात आला असून नव्याने समाविष्ट झालेल्या 29 गावांचा सर्वे चालू आहे. पनवेल हद्दीतील एकूण 60 झोपडपट्टीत 8755 झोपड्या आहेत. त्यांचे लाभार्थी निश्चित करून दुसर्‍या टप्प्यातील अहवाल शासनाकडे पाठवला आहे. महापालिकेने बनवलेल्या डीपीआरला म्हाडा आणि केंद्र शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर शहर झोपडपट्टीमुक्त झालेले पाहायला मिळणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी नागरिकांबरोबर सुसंवाद साधताना सांगितले. पाहणी दौर्‍याप्रसंगी सह आयुक्त श्याम पोशेट्टी, प्रभाग ड प्रमुख श्रीराम हजारे, अग्निशमन अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता अधिकारी अरुण कांबळे, आर. जाधव आदी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट