मेनोपॉजचा त्रास सहन करत बसू नका, सखी तुमच्यासोबत आहे . Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पनवेलमधील 257 दिव्यांगांना शिधापत्रिका

पनवेल : महसूल विभागाच्या वतीने पनवेल परिसरामधील 257 दिव्यांगांना व विधवांना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांगांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.

महसूल विभागाच्या वतीने अपंग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्यांग नागरिकांमधील गुणवत्ता पाहून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनांचा त्यांना जास्तीत जास्त लाभ होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून सर्वांनी मदत केल्यास त्यांना सामाजिक सुरक्षितता प्राप्त होऊ शकते, असे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले. समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ होऊ शकतो. लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिकेची झेरॉक्स, सिव्हिल सर्जनचा दिव्यांग दाखला, अर्जदार यांच्या वयाचे दाखले, अर्जदार यांच्या मुलांच्या वयाचे दाखले, स्थानिक रहिवासी दाखला, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक अकाउंट नंबर, तलाठी पंचनामा, लाइट बिल, सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत अशा सर्व गोष्टी ऑनलाइन केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याचेसुद्धा पुरवठा अधिकारी स्मिता जाधव यांनी सांगितले. तसेच निवडणूक शाखेतील लेखनिक श्रीकांत इचके यांनी कार्यक्र मात निवडणूक ओळखपत्र मिळण्यासाठी लागणार्‍या कार्यपद्धतीची आणि त्याचे मिळणारे लाभ याची माहिती उपस्थितांना दिली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट