..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महावितरणची फसवणुक करणारा अभियंता निलंबित

पनवेल : महावितरणच्या नावडे शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी वीजबिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून त्याद्वारे महावितरणची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वैभव सिंह याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले आहेत.

पनवेल-1 उपविभाग अंतर्गत नावडा शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी सात लाख 76 हजारांच्या 641 ग्राहकांच्या रिसिप्ट रद्द करून महावितरणच्या लाखो रुपयांचा अपहार केला होता.महावितरणकडे लाखो नागरिक आपले वीजबिल भरण्यासाठी येत असतात. नावडे येथील महावितरणच्या कार्यालयात वीजबिल भरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांच्या बिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून सिंह यांनी ते पैसे स्वत:साठी वापरले. वीजबिल भरूनदेखील दुसर्‍या महिन्यात ग्राहकाच्या बिलामध्ये मागील थकबाकी आल्याने ग्राहकांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठले. या वेळी हा प्रकार उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह याला निलंबित करण्यात आले असून, त्याच्याकडून जवळपास सात लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आल्याचे समजते. यात आणखी काही अधिकार्‍यांचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वैभव सिंहवर दोषारोप पत्र ठेवून अधीक्षक अभियंता वाशी मंडळ यांच्या नियंत्रणात चौकशी करण्यात येत आहे. या फसवणूक प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट