पनवेल महापालिकेचे मिशन इंद्रधनुष्य
60 वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण होणार
पनवेल : लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना आणि गर्भवती मातांना पुन्हा लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य असे नाव या मोहिमेला देण्यात आले असून पनवेल महापालिकेचा आरोग्य विभाग मोहीम यशस्वीपणे राबविण्यास सज्ज झाला आहे. पुढील चार महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहीम राबविली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांत आणि 20 महापालिकांमध्ये आयएमआय 2.0 या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य राबविण्याचे ठरविले आहे. पनवेल महापालिकेने हे मिशन यशस्वी करण्यासाठी पावले उचलले आहेत. यापूर्वी झालेल्या लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांना शोधण्याचे महापालिकेपुढे आव्हान असणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी नुकतीच आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकार्यांची बैठक घेऊन या मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रत्येक बालकाला या लसीकरणाचा लाभ मिळाला पाहिजे. सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांची बैठक बोलावून आयुक्त गणेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेच्या माध्यमातून जन्मास आलेले बालक ते दोन वर्षांच्या बालकास 60 वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जाणार आहेत. याशिवाय गर्भवती महिलांनादेखील लसीकरण केले जाणार आहे. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन आजार कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. सोमवारपासून लसीकरण मोहीम सुरू झाली असून डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या पहिला आठवड्यात मोहीम राबविण्यात येणार आहे.
मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व बालकांना आयएमआय 2.0 लस दिली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या लसीकरणात लस देऊ न शकलेल्या बालकांना लस देण्यात यावी, असा या मोहिमेचा उद्देश आहे. आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे महापालिकेचे आवाहन असेल.
डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times