कमी खर्चात प्रभावी उपचार : नवी मुंबई, ऐरोली येथे सहयोग होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्घाटन. कामोठे मध्ये रेल्वे स्थानक परिसर व अग्निशमन दलासाठी राखीव प्लाॅट वरती अतिक्रमणाविरोधी कारवाई Kavach Commissioned of in Prayagraj – Kanpur Section of NCR २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे जागतिक झुकाव वेगाने; वाहन उद्योगात मोठा बदल डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पनवेल महापालिकेचे मिशन इंद्रधनुष्य

60 वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण होणार

पनवेल : लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना आणि गर्भवती मातांना पुन्हा लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य असे नाव या मोहिमेला देण्यात आले असून पनवेल महापालिकेचा आरोग्य विभाग मोहीम यशस्वीपणे राबविण्यास सज्ज झाला आहे. पुढील चार महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहीम राबविली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांत आणि 20 महापालिकांमध्ये आयएमआय 2.0 या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य राबविण्याचे ठरविले आहे. पनवेल महापालिकेने हे मिशन यशस्वी करण्यासाठी पावले उचलले आहेत. यापूर्वी झालेल्या लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांना शोधण्याचे महापालिकेपुढे आव्हान असणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी नुकतीच आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकार्‍यांची बैठक घेऊन या मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रत्येक बालकाला या लसीकरणाचा लाभ मिळाला पाहिजे. सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांची बैठक बोलावून आयुक्त गणेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेच्या माध्यमातून जन्मास आलेले बालक ते दोन वर्षांच्या बालकास 60 वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जाणार आहेत. याशिवाय गर्भवती महिलांनादेखील लसीकरण केले जाणार आहे. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन आजार कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. सोमवारपासून लसीकरण मोहीम सुरू झाली असून डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या पहिला आठवड्यात मोहीम राबविण्यात येणार आहे.

मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व बालकांना आयएमआय 2.0 लस दिली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या लसीकरणात लस देऊ न शकलेल्या बालकांना लस देण्यात यावी, असा या मोहिमेचा उद्देश आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे महापालिकेचे आवाहन असेल.

डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट