डोकेदुखीला कायमचा रामराम - विशेष होमिओपॅथिक क्लिनिक सुरु पुण्यात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? नारळाच्या झाडांवरून नवा वाद Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पनवेलमधील आदिवासींना अमृत आहार

गर्भवती महिला, 6 वर्षांपर्यंतच्या बालकांना मिळणार लाभ

पनवेल : आदिवासी भागातील गर्भवती महिला आणि बालकांचे कुपोषण टळावे, या हेतूने राज्य सरकारने डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा विस्तार केला आहे. यापूर्वी आदिवासी तालुक्यात राबविली जाणारी अमृत आहार योजना आता पनवेलमधील आदिवासींसाठीदेखील राबविली जाणार आहे. सोमवारी पनवेल पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आली.

ग्रामीण भागात राहणार्‍या आदिवासी गर्भवती, स्तनदा मातांना चांगला आहार देऊन जन्माला येणार्‍या बाळाला आणि सात महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना आहार देऊन कुपोषण टळावे, असा या योजनेचा हेतू आहे. या योजनेत अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणार्‍या आहारासोबत विशेष आहार म्हणून सात महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना आठवड्यातून चार दिवस अंडी किंवा केळी दिली जाणार आहेत, तर गर्भवती आणि स्तनदा मातांना आठवड्यातून सहा दिवस एकवेळचा चौरस आहार म्हणून सोमवार ते शनिवारी सहा दिवस अंडी, केळी, चपाती, दोन भाज्या आणि वरण भात दिला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा आहार दिला जाणार आहे. एकात्मिक बालविकास सेवायोजना 2 मधील 23 अंगणवाड्यांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे. या सर्व अंगणावाड्यांमध्ये 88 गर्भवती माता, 108 स्तनदा माता, सात महिने ते सहा वर्षांच्या 937 बालकांचा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर यापूर्वी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ मिळत नव्हता. राज्य सरकारने या योजनेचा यंदा विस्तार केल्यानंतर पनवेल तालुक्याचादेखील समावेश झाल्यामुळे निधी उपलब्ध होताच पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे यांनी योजनेचा लाभ लाभार्थींना देण्यास सुरुवात केली. राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार्‍या पैशांतून आदिवासींना चांगला आहार मिळावा, यासाठी चांगल्या प्रतीचा आहार बनवून द्यावा, अशा सूचना संबंधित अंगणवाडी सेविकांना दिल्या असल्याची माहिती देण्यात आली. पनवेल तालुक्यातील धामणी या ठिकाणी औपचारिक कार्यक्रम घेऊन पनवेल तालुक्यातील या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट