कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी 76 जणांवर गुन्हा दाखल
- by
- Feb 18, 2020
पनवेल ः कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासोबत बँकेच्या संचालक मंडळांतील 14 सदस्यांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास 512. 50 कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून 17 फेब्रुवारीला रात्री फिर्यादी म्हणून जिल्हा विशेष लेखा परिक्षक उमेश गोपिनाथ तुपे यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेचे नियमांचे उल्लंघन करुन, आपआपसात संगणमत करुन, गैरव्यवहार करण्याच्या हेतुने कागदपत्रामध्ये फेरफार केला, कागदपत्रे नष्ट केली, बनावट कागदपत्रे तयार केली. त्याचा सदर कर्ज प्रकरणात वापर करुन बँकेचे सभासद, ठेवीदार व शासनाची फसवणुक करुन ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपये रकमेच्या ठेवींचा अपहार केला व बॅकेची आर्थिक स्थिती डबघाईस आणली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहकारी संस्थेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच सन 2008 ते आज पर्यंत विवेक पाटील यांनी बोगस कर्ज प्रकरणातून 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपये अपहार केल्याचे लेखा परिक्षणाच्या अहवालातून उघड झाले असून हा मुद्देमाल अद्याप मिळाला नसल्यचे तक्रारीत नमूद आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास तपास पोलीस निरीक्षण (प्रशासन) शत्रुघ्न माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाळा बँकेच्या हजारो ठेवीदारांना व खातेदारांना पैसे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देऊन ठेवीदारांना पैसे परत मिळत नाही. याशिवाय बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास 512. 50 कोटी कर्ज काढल्याचा ठपका सहकार खात्याने कर्नाळा बँकेवर ठेवला आहे.
सहकार खात्याबरोबरच पाठपुरावा करीत असताना मागिल महिन्यात आरबीआयवर तसेच नुकताच पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. याची दखल घेत सहकार खात्याच्या तक्रारीवरून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील आणि बँकेच्या 14 संचालकांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times