उलवे नोडमध्ये डॉक्टरला कोरोना
पनवेल : पनवेल ग्रामीणमधील उलवे नोडमध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई मधील तेरणा हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन हेड म्हणून कार्यरत असल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.
उलवे सेक्टर 25 मध्ये राहत असलेल्या या डॉक्टरांच्या सोबत राहत असलेल्या त्यांच्या आई व पत्नीचे कोरोनाचा (कोविड 19) अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. तसेच त्यांच्यासोबत काम करणार्या सहकार्यांना 4 सहकार्यांना होम क्वारंटाईन राहाण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे, या डॉक्टरांनी सोमवारी काही रुग्णांना तपासले असल्याने संबंधित रुग्णांनी आमच्याशी संपर्क साधावे असे आवाहन प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले आहे.ग्रामीण भागात नव्याने रुग्णांची नोंद झाल्याने पनवेल ग्रामीण ची संख्या 7 झाली आहे. तर पनवेल महानगर पालिका हद्दीत गुरुवारी नवीन रुग्ण सापडला नसल्याने पालिका हद्दीत रुग्णांची संख्या 40 आहे. यापैकी 14 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 4 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times