सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पेणमधील चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : गृह राज्यमंत्री

रायगड : पेण येथील चिमुरडीची बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असून उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथील चिमुरडीवर केलेल्या बलात्कार आणि हत्येसंदर्भात राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी, त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. 

पीडित कुटुंबियांना जिल्हास्तरावरील योजनेचा निधी देण्यात येणार असून शासनाच्या योजनेतून घर बांधून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले. तसेच, शक्य झाल्यास आरोपीवर मोक्काची कारवाई करण्यात येणार असल्याचे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असून उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पेणमधील या घटनेचा निषेध करीत शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळेस, पेण शहरातील बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला होता.

पेण शहराजवळ असलेल्या आदिवासी वस्तीतील एका अडीच वर्षाची चिमुरडी ही तिच्या आई-वडिलांसोबत घरात झोपली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला घरातून नेऊन जवळच असलेल्या झुडपामध्ये तिच्यावर बलात्कार करुन हत्या केली. त्यानंतर तिला घरात ठेवत असताना जागे झालेल्या आजूबाजूच्या रहिवाशांनी या आरोपीला घरात शिरताना पाहिल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचं या रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तातडीने यासंदर्भात पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा घरामध्ये आढळून आला. पोलिसांनी या 28 वर्षीय आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या चिमुरडीवर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये हे शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळेस आदिवासी वस्तीतील रहिवाशांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर या आदिवासी रहिवाशांनी या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपीवर यापूर्वी देखील तडीपारीची गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट