सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

महाराष्ट्रातील 57 शूर पोलिसांमध्ये नवी मुंबईतील तीघांचा समावेश

मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यात चार पोलीस अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदक, 13 जणांना पोलीस शौर्य पदक तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले. या शूरांमध्ये नवी मुंबईतील तीन पोलीस शूरांचा समावेश आहे. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गृह मंत्रालयाने घोषीत केलेल्या महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट सेवा पदक, गुणवत्तापूर्ण सेवा पदके देऊन पोलिसांचा गौरव केला जातो. महाराष्ट्राने 57 पदके मिळून देशात तिसरं स्थान मिळवले आहे. नवी मुंबई पोलीस उपायुक्त(गुन्हे शाखा) प्रविणकुमार पाटील, पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर, सहायक उपनिरिक्षक संजय पवार यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक देण्यात आले. तसेच ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती उर्फ एन.टी. कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक संगीता शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक प्राप्त झाले. तर भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस, पोलीस मुख्यालयातील सहा.पो. उपनिरीक्षक थॉमस डिसुझा, गुन्हे शाखेचे सहा.पो. उपनिरीक्षक सुरेश मोरे आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक मिळाले आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक पदके
राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदके जाहीर झाले असून सर्वाधिक पदके गडचिरोली जिल्ह्याला मिळाली आहेत. 2018 मध्ये माओवादविरोधी कारवाईत कसनासूर बोरियाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते, त्या कारवाईचे नेतृत्व करणारे तत्कालीन माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी (सध्या अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक) तसेच प्राणहीता पोलीस उपमुख्यालयाचे तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक राजा (बीड येथे पोलीस अधीक्षक) या दोन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह सी-60 कमांडो पथकाच्या जवानांना ही शौर्य पदके जाहीर झाली आहेत. याशिवाय एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस हवालदार तसेच पाच पोलीस नाईक आणि 3 पोलीस अमलदार यांचा यात समावेश आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट