सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

कामचुकार कर्मचार्‍यांवर भरारी पथकांचा वॉच

पनवेल पालिका आयुक्तांकडून दखल ; अचानक भेटी देण्याच्या सूचना

पनवेल : वारंवार समज देऊनही पनवेल पालिकेतील काही कर्मचारी, अधिकार्‍यांचे बेशिस्त वर्तन सुरूच आहे. यामुळे पालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने पालिका आयुक्तांनी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून हे पथक अचानक कार्यालयांस भेटी देणार आहे.

पनवेल पालिकेचा कारभार आधीच कमी मनुष्यबळावर सुरू आहे. त्यात कामचुकार अधिकारी, कर्मचार्‍यांमुळे याचा ताण पडत आहे. तसेच या बेशिस्तीमुळे थेट सभांमध्ये सदस्यांकडून तक्रारी मांडल्या जात आहेत. असे असताना शनिवार, रविवार सुट्टी व मंगळवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने सोमवारी 23 कर्मचारी काहीही न सांगता गैरहजर राहिले. याची गंभीर दखल पालिका आयुक्तांनी घेतली आहे. यासह कामात वेळकाढूपणा, प्रशासकीय इमारत तसेच प्रभाग कार्यालयांबाहेर दिसणारे कर्मचारी, स्वत:चे आसन सोडून फेरफटका मारणारे कर्मचारी तसेच कार्यालयाबाहेर पडताना नोंदवहीत नोंद न करणारे कर्मचारी यांच्यावर आता भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. या पथकामध्ये सेवानिवृत्त सैन्यदलाचे कर्मचारी सदस्य असणार आहेत.

हे पथक सतर्कता विभागाप्रमाणे बेशिस्त अधिकारी व कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवणार आहेत. हे पथक कोणत्याही कार्यालयात कधीही भेट देणार असून यात बेशिस्तपणा आढळल्यास त्याचा अहवाल विभागप्रमुखाला देणार आहे. संबंधित विभागप्रमुख संबंधीची कारवाई तपशील या पथकाला देणार आहे. जर विभागप्रमुख संबंधित कर्मचार्‍याला पाठीशी घालत असतील तर त्याची चौकशी उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त व आयुक्त स्तरावरील अधिकारी करणार आहेत.

या भरारी पथकामध्ये सुरेश गांगरे, रमेश पाटील या पालिकेच्या अधीक्षकांसह सेवानिवृत्त सैन्यदलाचे कर्मचारी अमीर घोलप यांच्यासह सुरक्षारक्षक संदीप सावंत यांची नियुक्ती पालिकेने केली आहे. तसेच विभागप्रमुख त्यांच्या मर्जीतील कर्मचार्‍यांना सोयीनुसार कामांचे वाटप करतात. याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांना समान कामाचे वाटप करावे तसेच सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा ही कार्यालयीन वेळ पाळावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास यावर कारवाई करण्यात येणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट