सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सेवा सिडको देत असताना पालिकेला कर का द्यावा?

खारघरवासियांचा बैठकीत सवाल ; पालिकेच्या मालमत्ता कराला विरोध

पनवेल ः सिडको वसाहतीमधून पालिकेने मालमत्ता कर गोळा करण्याच्या आखलेल्या योजनेला सर्व स्तरातून विरोध होत आहे. सिडकोकडे येथील नागरिक सेवा कर जमा करत असताना केवळ कचरा उचलण्याच्या कामासाठी मागील चार वर्षांचा मालमत्ता कर का भरावा, असा प्रश्न खारघर येथे रविवारी पार पडलेल्या बैठकीत नागरिकांनी उपस्थित केला. खारघर परिसरात आजही रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा सिडको प्रशासनाकडून दिल्या जात असताना मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेला अवाढव्य कर येथील नागरिकांनी का द्यावा? असा सवाल उपस्थित केला आहे. 

महाविकास आघाडीच्या वतीने मालमत्ता करासंदर्भात येथील रहिवाशांचे अभिप्राय घेण्यात आले. या वेळी आमदार बाळाराम पाटील, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, काँग्रेसचे आर. सी. घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक गुरुनाथ गायकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र करावकर आदी उपस्थित होते. खारघर परिसरात लवकरच मालमत्ता कराच्या नोटीस येणार असल्याची माहिती प्राप्त होताच महाविकास आघाडीच्या वतीने खारघरमध्ये रविवार मालमत्ता करासंदर्भात खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. सिडकोकडून खारघरमध्ये केवळ साठ टक्के विकासकामे झाली आहेत. अजूनही अनेक नोड अविकसित आहेत. आजही नागरिक सिडकोकडे सेवा कर भरणा करतात. पालिका केवळ कचरा उचलण्याचे काम करीत असून कोणत्या आधारावर चार वर्षांच्या मालमत्ता कराची नोटीस पाठवीत आहे. सत्ताधिकारी केवळ मूग गिळून बसले आहेत, असा आरोप या वेळी सत्ताधिकार्‍यांवर करण्यात आला. पालिका नागरी सुविधांचे काम करण्याऐवजी मालमत्ता कराची मागणी करून नागरिकांवर अन्याय करीत आहे. खारघरवासी हे सहन करणार नाहीत, असा इशारा दिला. पालिका हद्दीत मालमत्ता कराची नोटीस पाठवून पालिका केवळ शिदोरी गोळा करण्याचे काम करीत असेल तर पालिकेच्या विरोधात लवकरच भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार बाळाराम पाटील यांनी दिला. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट