सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

एमपीएससी उमेदवारांसाठी टोल फ्री सुविधा

मुंबई : दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्‍या परीक्षा हजारो उमेदवार देत असतात. या उमेदवारांसाठी खास सुविधा  सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी एमपीएससीकडून टोल फ्री-हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली आहे.

एमपीएससीने उमेदवारांसाठी टोल फ्री क्रमांक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी, परीक्षेसंदर्भात शंका व इतर सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडवण्याचं काम या टोल फ्री सुविधेमार्फत केले जाणार आहे. यासाठी एमपीएससीने उमेदवारांना 1800-1234-275 आणि 1800-2673-889 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवाराच्या प्रत्येक अडचणीचे शंकाचे निवारण रोज सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 8 आणि शनिवार, रविवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत केले जाणार आहे. टोल फ्री क्रमांक व्यतिरिक्त उमेदवारांना support-onlinempsc.gov.in या ई-मेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना किंवा अर्ज भरताना व इतर तांत्रिक अडचणीमुळे संपर्क नेमका कसा करावा? व तात्काळ अडचण कशी सोडविता येईल? असा प्रश्न पडायचा. शिवाय, अनेकदा संपर्क करून सुद्धा शंका निवारण होत नव्हते. त्यामुळे या सुविधेमुळे उमेदवारांना आपले परिक्षेबाबतच्या अडचणी, शंका सोडविण्याचे काम ‘एमपीएससी’कडून केले जाणार आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट