खारघर गावचे रुपडे पालटणार
11 कोटी 38 लाखांच्या विकासकामाला मंजुरी
पनवेल : स्मार्ट शहर असलेल्या खारघरला ज्या गावावरुन ओळख मिळाली ते गाव आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. पालिकेच्या स्थापनेपासून खारघर गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून खारघर गावाच्या विकासासाठी पालिकेने सुमारे 11 कोटी 38 लाखांच्या विकासकामाला मंजुरी दिल्याने खारघर गाव स्मार्ट होणार आहे.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातदेखील खारघर गावाचा विकास खुंटला होता. खारघर गावावरून शहराला नाव मिळाले असले तरी हे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले. प्रवीण पाटील यांनी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपददेखील भूषविले आहे. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामांना चालना मिळाली. लवकरच त्या ठिकाणच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवातदेखील होणार असल्याने खारघर गाव खर्या अर्थाने स्मार्ट होणार आहे. खारघर गावात ग्रापंचायतीचे कार्यालय असूनदेखील गावात मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या नव्हत्या. या सर्व कामांना सुरुवात होणार असून ग्रामस्थांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने या कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमध्ये गावांमध्ये विद्युत व्यवस्था, जलकुंभ उभारणे, मुख्य जलवाहिनी टाकणे, विद्युत यांत्रिकी कामे, वाहिन्या जोडणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, भुयारी गटारे बांधणे, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदींचा समावेश आहे. यासाठी 11 कोटी 38 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
ही कामे होणार
विद्युत व्यवस्थेसाठी 1 कोटी 17 लाख, 5 लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यासाठी 1 कोटी 93 हजार, मुख्य जलवाहिनी 15 लाख रुपये, विद्युत यांत्रिकी कामे 9 लाख 98 हजार, मलनिःसारण वाहिन्या जोडणे (बाहेरील ) 51 लाख 82 हजार , मलनिःसारण वाहिन्या जोडणे (घराजवळ) 88 लाख 42 हजार, रस्ते 2 कोटी 18 लाख, पावसाळी गटारे 2 कोटी 5 लाख, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे यासाठी 2 कोटी 23 लाख खर्च केले जाणार आहेत.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times