सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

आंबा व्यावसायिकाला साडेचार लाखांचा गंडा

900 डझन आंब्यांचा केला अपहार ; अज्ञात त्रिकूटावर गुन्हा दाखल

पनवेल ः कळंबोली वसाहतीमधून होलसेल आंब्यांची विक्री करणार्‍या एका व्यावसायिकाची 900 डझन आंब्याचा अपहार करुन जवळपास 4 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कंळबोली पोलीस ठाण्यात अज्ञात त्रिकूटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत ब्रह्मदेव कन्हेरे यांचा होलसेल दरात आंबे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. यासंदर्भात त्यांनी एका अ‍ॅपवर जाहिरात टाकली होती. त्या माध्यमातून 10 मे रोजी मुकेश पटेल नामक व्यक्तीने त्यांना 900 डझन आंब्याच्या 200 पेट्यांची ऑर्डर दिली होती. प्रत्येक पेटीचे 2200 रुपये ठरले होते. त्यानुसार अनिकेत कन्हेरे हे 17 मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर माल घेऊन बोलेरो पिकअपने मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट येथे पोहोचविण्यास गेले होते. परंतु तेथे पावसाचे पाणी भरल्याचे सांगून पेट्या शिवडी-रे रोड येथील बीपीटी टोलनाक्याच्या पुढे आणण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार अनिकेत यांनी सदर माल सलिम नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात दिला व पैशांची मागणी केली. त्यावेळी क्रॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात जाऊन पैसे घेण्यास कन्हेरे यांना सांगण्यात आले. तसेच सलिमने अनिकेत यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीला पाठवले होते. मात्र तिथे गेल्यानंतर मुकेश पटेल याचे ऑफिस नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनिकेत कन्हेरे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबतची तक्रार त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर तीन जणांविरोधात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट