सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

निकषात न बसणार्‍या वारसांनाही आर्थिक मदत

राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय ; पाच लाख देणार 

मुंबई : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मात्र शासनाच्या निकषात न बसणार्‍या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसांनाही 5 लाखांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

एसटीचा मंगळवारी, 1 जून 2021 रोजी 73 वा वर्धापनदिन पार पडला. महामंडळाच्या मुख्यालयात साधेपणाने छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचार्‍यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांना 50 लाख रुपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचार्‍यांसाठीही 30 जून 2021 पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचार्‍याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात अ‍ॅड. परब यांनी कामगारांना आश्वस्त केले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट