सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पीएम-सीएम भेटीत काय झाली चर्चा

मुंबई : राज्यातील प्रलंबित प्रश्‍नांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी राज्यातील प्रलंबित असणारे प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली.

मोदी यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले आहेत. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही  यावेळी केली. मराठा आरक्षण, मागावसर्गीयाचं बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागेची उपलब्धतता आणि जीएसटी परतावा, पीक विमा याबाबत मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान मोदी सोडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

चर्चेतील मुद्दे

  • एसईबीसी मराठा आरक्षण
  • इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
  • मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
  • मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे
  • राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई
  • पिक विमा योजना : बीड मॉडेल
  • बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
  • नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे
  • 14 व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक)
  • 14 व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था)
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
  • राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवड करण्याबाबत


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट