मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा; यशस्वी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सिडकोमध्ये महिला दिन उत्साहात साजरा मेनोपॉजचा त्रास सहन करत बसू नका, सखी तुमच्यासोबत आहे . न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

अभंग -ओव्यांची जपणूक आणि प्रसार ही आपली जबाबदारी - नितिन कोलगे

 
मुंबई (ऋषिकेश तटकरे) : आपल्या मायबोली मातृभाषेला सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची परंपरा आहे.आपल्या   संत ज्ञानेश्वर महारांजांनी ज्यांना आपण साक्षात माऊली- परमेश्वर मानतो, या ज्ञानेश्वर माऊलींनी, ज्ञानेश्वरी- पसायदान,व तुकाराम महाराजांनी अभंग तसेच रामदास स्वामींनी ‌. दासबोध लिहिले. त्याचबरोबर संत नामदेव,संत एकनाथ महाराज यासारख्या अनेक संतांनी अभंगांद्वारे आपल्या या मायबोली मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. त्या आपल्या मातृभाषेची जपणूक करण्याची जबाबदारी आता आपली असल्याचे, उद्गार दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध युवा उद्योजक नितिन कोलगे  यांनी नुकतेच येथे केले.
    ते कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पुरस्कृत  जन शिक्षण  संस्थान,वरळी या संस्थेने मुंबईतील वरळी येथील संस्थेच्या मुख्यालयात जागतिक मराठीभाषा दिनानिमित्त तसेच मातृभाषा सप्ताहातील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जन शिक्षण संस्थेच्या संचालिका  सौ.अरूणा मोहिते मॅडम,सौदर्य प्रसाधन शिक्षिका सौ.वंदना गोंधळे मॅडम  तसेच कार्यक्रम अधिकारी श्री.सुनिल शेमणकर आदि मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते.
     श्री.कोलगे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,मराठी माणसाने मराठी भाषेची जपणूक  करण्याबरोबरच ,व्यवसायात उतरणेही गरजेचे आहे‌.कोणताही व्यवसाय छोटा नसतो.छोट्या व्यवसायाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर करणे हे आपल्या हातात असते.त्यासाठी मनात जिद्द आणि त्यासाठी लागणारी भरपूर मेहनत यांची योग्य सांगड घातल्यास व्यवसायात आपल्याला हवी असलेली उंची गाठणे अवघड नाही.यावेळी‌ युवा उद्योजक नितिन कोलगे यांनी बिना पैशाशिवाय व्यवसाय कसा करावा याविषयी तसेच रक्तदान याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
    तसेच यावेळी या विद्यार्थ्यांनी‌ सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पारंपारिक मनोहारी नृत्ये सादर करून सर्वांचे मनोरंजन केले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट