सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

क्षणांत पेटली धावती गाडी पोलिस शिपाई रमेश उथळे यांनी तत्परतेने आग विझविली


मुंबई (प्रतिनिधी) : आपुले मरण पाहिले म्या डोळा.. असाच अनुभव एका महिलेला आणि त्यांच्या वाहनचालकाला मुंबईत आला. धावत्या गाडीने अचानक पेट घेतला पण त्यापूर्वीच गाडीतून धुर आल्याचे दिसल्याने महिलेने तत्काळ गाडी थांबवली अन् गाडीतून बाहेर निघाली, तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला. यात गाडी पूर्णतः जळून खाक झाली असून महिला या घटनेत थोडक्यात बचावली. ही घटना आज (६ डिसेंबर) राणीबाग परिसरातून जाताना दुपारी ४च्या सुमारास घडली. 


रस्त्यावरून जात असताना मध्यभागी अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे जागीच चालकाने कार थांबवून तिच्या मालकाला कारमधून उतरण्यास सांगितले आणि तोही बाहेर पडला. काही सेकंदातच गाडीला आग लागली.


राणीबाग परिसरात ह्युंडाई आय२० गाडीला आग लागलेली पाहताच कर्तव्यदक्ष व कर्तव्यतत्पर पोलिस शिपाई रमेश उथळे यांनी तत्परतेने आग विझविली. मुंबई पोलीस जगात दुसर्‍या क्रमांकावर का आहेत. आज पुन्हा त्याची प्रचिती रमेश उथळे यांच्या जबाबदार आणि जिगरबाज कामगिरीमुळे आली. मुंबई पोलीस दलात असे बहाद्दर सेवाव्रती कर्मचारी कार्यरत असल्यामुळेच मुंबईकर निश्चिंत जगू शकतात. रमेश उथळे यांचे गाडीमालक आणि चालक यांनी पुन्हापुन्हा आभार मानले.


घटनेनंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. या घटनेनंतर रस्त्यावर ३० मिनिटे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट