सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

निबंध व चित्रकला स्पर्धेतून कल्याण परिमंडलात वीज सुरक्षेबाबत जनजागृती महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताह!!

कल्याण/वसई/पालघर: दि. ०४ जून २०२५ 

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन राज्यभरात १ ते ६ जून दरम्यान वीज सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी मंगळवार व बुधवारी (०४ जून) कल्याण परिमंडलात विविध ठिकाणी निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.


मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत असून अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत विविध माध्यमातून वीज सुरक्षेचा जागर करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांच्या उपस्थितीत कल्याण मंडल एक अंतर्गत कल्याण पूर्व व पश्चिम तसेच डोंबिवली विभागात विविध ठिकाणी निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर उंबर्डे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना तर तेजश्री इमारतीतील प्रशिक्षण केंद्रात कर्मचारी व पाल्यांना वीज सुरक्षेचे धडे देण्यात आले.


अधीक्षक अभियंता विजय फुंदे यांच्या उपस्थितीत कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर एक आणि दोन, बदलापूर, कल्याण ग्रामीण विभागात महावितरण कर्मचारी व पाल्य तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षेबाबत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तर अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसई मंडलातील वसई व विरार विभागात तसेच पालघर मंडलात विविध ठिकाणी तसेच शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धांच्या माध्यमातून वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.


वसुंधरा दिनानिमित्त गुरुवारी (०५ जून) परिमंडलातील सर्वच दहा विभाग कार्यालय स्तरावर वीज सुरक्षा व बचत विषयी रॅली काढण्यात येणार आहे. तर ६ जून रोजी सकाळी परिमंडलातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र वीज सुरक्षेबाबत प्रतिज्ञा घेणार आहेत. याच दिवशी महावितरणचा २०वा वर्धापन दिन सर्व कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.


रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट