सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे


पुणे दि.७:-   मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे.मनुष्याच्या  आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे झाळे वाढणे आवश्यक आहे असे मत उप सभापती डॉ .नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले .

          ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन,सहयाद्री देवराई,वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "देवराई" संकल्पनेवर आधारितप्रदर्शन आणि प्रकल्पांचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे.त्या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.,पुण्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते, जेहलम जोशी,पर्यावरण संवर्धन अधीक्षक मंगेश दिघे,ग्रीन हिल्स ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ,देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले,भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे,देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर आणि वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ सहयाद्री देवराईच्या स्मिता जगताप आदी उपस्थित होते. 

        यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,येत्या कालावधीत आपल्या सर्वांना रिफ्युज,रियुज , रिड्युस,रिसायकल आणि रिथिंक या पाच " आर " वर काम करावे लागणार आहे.किल्ले आणि दुर्ग संवर्धनासाठी राज्यसरकारने 3 टक्के निधी मंजूर केला आहे.या निधीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकधिक काम करण्याची गरज आहे.त्याच बरोबर आपण सर्वानीच वनविभागाच्या ज्या जागा आहेत. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम केले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

        तसेच त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येक तालुक्यात देवराई निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतला आहे.परंतू जीआर निघून ही या योजनेचा पुरेसा प्रचार प्रसार झालेला नाही.पण सध्याचा काळ हा सोशल मिडीयाचा असून या माध्यमांचा वापर करून आपल काम, योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच काम करावे, शासनाच्या प्रत्येक योजनेत समाजाचा देखिल सहभाग असणे आवश्यक आहे.या दृष्टीने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी देखील याबाबत पुढाकार घ्यावा,पुणे मनपाने देखील सामाजिक संस्थांशी समन्वय साधत फोरम ची स्थापना करून राज्य सरकारच्या पर्यावरण पूरक योजना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्ट्रीने कार्यतत्पर राहावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट