सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना (plane crash) घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात (passenger aircraft) कोसळलं आहे. एअर इंडियाचं (Air India) ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले. 

एअर इंडियाचे बी 787 ड्रीमलायनर विमान AI 171 या प्रवासी विमानाचा अपघात झाला असून यामध्ये 244 प्रवासी होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात ते कोसळले. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचे व्हिडीओंमध्ये दिसून येते. दरम्यान, अहमदाबाद पोलीस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमान अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी या विमानाने दुपारी 1.38 वाजता या विमाने उड्डाण केले होते. तर अवघ्या 5 मिनिटांनी या विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्येच या विमानाचा अपघात झाल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. मी अधिकाऱ्यांना या अपघातात तातडीने बचाव आणि मदत कार्य हाती घेण्याचे तसेच जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याचे आणि रुग्णालयात सर्व उपचारांची व्यवस्था प्राधान्याने करण्याचे निर्देशही मी दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही माझ्याशी बोलून या विमान अपघातात बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ पथके आणि केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.” अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली आहे.

विमान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज हवाई वाहतूक तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दुसरीकडे अपघाताचे वृत्त समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी दुरध्वनीवरून चर्चा केली आहे. बचावकार्यात केंद्र सरकारच्या मदतीची तयारीही दर्शवली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची पोस्ट X वर (पूर्वीचे ट्विटर) टाकली आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट