सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत…

या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. विजय रुपाणी हे अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. हे विमान अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेला रवाना झालं होतं. पण टेकऑफनंतर अवघ्या काही क्षणात हे विमान कोसळलं. हे विमान एका मेडिकल कॉलेजवर कोसळलं. तेथील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहावर विमान कोसळलं. त्यामुळे वसतीगृहाचंदेखील मोठं नुकसान झालं आहे. जवळपास 50 विद्यार्थी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. तर IMD ने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 12 केबिन क्रू मेंबर्सपैकी 3 कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला या विमानात क्रू मेंबर्स म्हणून कार्यरत होत्या. तर महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीन जण या विमानात प्रवासी म्हणून प्रवास करत होते.

अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. दुपारी अहमदाबादहून लंडनचं विमान असल्यामुळे अपर्णा महाडिक या आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत…

तसेच, टाटा ग्रुपने जाहीर केल्यानुसार, “या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा ग्रुप 1 कोटी रुपयांची मदत करेल. जखमींचा वैद्यकीय खर्चही आम्ही भरून काढू आणि त्यांची आवश्यक ती सर्व काळजी घेऊ, त्यांना मदत मिळेल याची खात्री करू. याव्यतिरिक्त, आम्ही बी जे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू.” अशी घोषणा टाटा ग्रुपकडून करण्यात आली आहे. “या अकल्पनीय काळात आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे आहोत.” असेही टाटा ग्रुपच्या अध्यक्षांमार्फत या पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

एअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे

या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३, आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके  यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट