Breaking News
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र सीवूड्स मधील शाळांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार सर्व शाळांनी हिंदी तृतीय भाषा म्हणून शिकवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या धोरणाला सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी ठाम विरोध केला आहे. महाराष्ट्रातील शाळा पहिली पासून हिंदी कशा शिकवतात हे आम्ही बघतो असा इशारा राजसाहेब ठाकरे यांनी दिला आहे. तसेच सर्व शाळांनी या शासन निर्णयाला विरोध करावा असेही म्हटले आहे. त्यानुसार सन्मा. राजसाहेब यांचे पत्र आज सीवूड्स मधील शाळांना देण्यात आले. मनसे शहर सचिव श्री. सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली आज सीवूड्स मधील शाळांना सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र देण्यात आले.
सीवूड्स मधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, डीएव्ही पब्लिक स्कूल, एस.एस. हायस्कूल, डॉन बॉस्को या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून पत्र देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांशी चर्चा करताना जाणवले की तीन भाषा पहिलीच्या मुलांना शिकवताना त्यांच्यावर ताण पडतो. मुलांची बौद्धिक वाढ खुंटते. जगभरात सर्व प्रगत देशा मध्ये पहिलीला एक किंवा दोनच भाषा शिकवल्या जातात. भारतात ही बहुतांश राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र कुठे ही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकवाव्या असा कल मुख्याध्यापकांचा दिसून आला. परंतु राज्य सरकारच्या शासन निर्णयाची भीती त्यांच्या मनात असल्याचे निदर्शनास आले. चर्चे दरम्यान मनसेचे सचिन कदम यांनी सांगितले केले की त्यांनी हिंदी भाषा शिकवण्याला आपला आक्षेप राज्य सरकारकडे नोंदवणे आवश्यक आहे. अन्यथा मनसेला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा ही देण्यात आला.
मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, मनविसे विभाग अध्यक्ष प्रद्युमन हेगडे, विभाग सचिव शंकर घोंगडे-पाटील, मनसे उप विभाग अध्यक्ष राजेंद्र खाडे, शाखा अध्यक्ष संदीप कांबळे, अखिल खरात, उप शाखा अध्यक्ष सोमनाथ चव्हाण, मयूर फाळके, किरण बेडेकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Suhas Kamble