Breaking News
तयारीचा वेळ: ३० मिनिटे | शिजवण्याचा वेळ: १ तास | सर्व्हिंग: ४–५ लोकांसाठी
चिकन बिर्याणी ही एक प्रसिद्ध आणि शाही डिश आहे. मसालेदार चिकन, तांदळाचे थर, खमंग सुगंध, आणि तुपाचा स्वाद यामुळे ही बिर्याणी खास प्रसंगांसाठी किंवा वीकेंड स्पेशलसाठी अगदी परफेक्ट आहे.
चिकन मॅरीनेशनसाठी (५०० ग्रॅम चिकन):
• चिकन – ५०० ग्रॅम
• दही – २ टेबलस्पून
• तिखट – १ टेबलस्पून
• हळद – ½ टेबलस्पून
• गरम मसाला – १ टिस्पून
• चिकन मसाला – २ टेबलस्पून
• कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरून)
• मीठ – चवीनुसार
• बासमती तांदूळ – ५०० ग्रॅम (३० मिनिटे भिजवलेले)
• पाणी – आवश्यकतेनुसार
• खडे मसाले – ३–४ लवंग, २ वेलदोडे, १ तमालपत्र, १ दालचिनी
• मीठ – चवीनुसार
• तेल – ३ टेबलस्पून
• तूप – २ टेबलस्पून
• कांदे – ६–७ मध्यम आकाराचे (बारीक चिरलेले)
• टोमॅटो – २ (बारीक चिरून)
• टोमॅटो प्युरी – २–३ टोमॅटोपासून तयार केलेली
• तिखट – २ टिस्पून
• गरम मसाला – १ टेबलस्पून
• हळद – ½ टेबलस्पून
• चिकन मसाला – २ टेबलस्पून
• बिर्याणी मसाला – १ टेबलस्पून
• मीठ – चवीनुसार
• तूप – २ टेबलस्पून (वरून)
• बिर्याणी मसाला – १ टिस्पून (टॉपिंगसाठी)
• कोथिंबीर आणि पुदिना – सजावटीसाठी
• फ्राय केलेले कांदे (बारीस्ता) – २ टेबलस्पून
• केशर दूध किंवा फूड कलर – २ टेबलस्पून दुधात मिसळून (ऐच्छिक)
1️⃣ चिकन मॅरीनेट करा
एका बाउलमध्ये दही, तिखट, हळद, गरम मसाला, चिकन मसाला आणि कोथिंबीर मिसळा. त्यात चिकन टाका आणि सर्व नीट मिक्स करून २०–३० मिनिटांसाठी मॅरीनेट करा. (जास्त वेळ ठेवल्यास चव आणखी चांगली येते.)
2️⃣ भात उकळून घ्या
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळून त्यात मीठ आणि खडे मसाले टाका. त्यात भिजवलेला बासमती तांदूळ टाकून ७०–८०% शिजवून घ्या. पाणी गाळून बाजूला ठेवा.
3️⃣ ग्रेवी तयार करा
मोठ्या खोलगट भांड्यात तेल व तूप गरम करून त्यात चिरलेले कांदे घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
नंतर त्यात टोमॅटो आणि टोमॅटो प्युरी टाका. तेल सुटेपर्यंत शिजवा.
त्यानंतर तिखट, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला व मीठ घालून परतून घ्या.
आता मॅरीनेट केलेले चिकन टाकून नीट शिजवा. ग्रेवी जाडसर झाली पाहिजे.
टीप: निम्मी ग्रेवी बाजूला काढून ठेवा (थर लावण्यासाठी).
4️⃣ बिर्याणीचे थर लावा
त्याच भांड्यात:
• खाली थोडी चिकन ग्रेवी
• मग अर्धा भात
• नंतर उरलेली ग्रेवी
• आणि वरून उरलेला भात
एक चमच्याने ४ छिद्र करून त्यात तूप ओता. केशर दूध / फूड कलर टाका.
कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला आणि तळलेले कांदे वरून भुरभुरवा.
5️⃣ दम प्रक्रिया (Dum Cooking)
झाकण लावून (किंवा पीठ लावून सील करून) आधी ५–७ मिनिटे तेज आचेवर, नंतर २०–२५ मिनिटे मंद आचेवर दमावर ठेवा.
गॅस बंद केल्यानंतर ३० मिनिटे झाकण न उघडता तसेच ठेवून द्या.
बिर्याणी गरम गरम रायता, कोशिंबीर किंवा उकडलेलं अंडं यासोबत सर्व्ह करा
IN ENGLISH:-
Chicken Biryani Recipe | चिकन बिर्याणी
Prep Time: 30 mins | Cook Time: 1 hour | Serves: 4–5
Chicken Biryani is a rich and aromatic one-pot dish, loved for its blend of tender chicken, long-grain basmati rice, and flavorful spices. This recipe is perfect for special occasions or a satisfying weekend meal — easy to follow, yet truly royal in taste.
• Chicken – 500g (washed and cleaned)
• Curd (Dahi) – 2 tbsp
• Red Chilli Powder – 1 tbsp
• Turmeric Powder – ½ tsp
• Garam Masala – 1 tsp
• Chicken Masala – 2 tbsp
• Fresh Coriander – 2 tbsp (chopped)
• Salt – to taste
• Basmati Rice – 500g (approx. 2½ cups, soaked 30 mins)
• Water – as needed
• Whole Spices – 3-4 cloves, 2 cardamoms, 1 bay leaf, 1 cinnamon stick
• Salt – to taste
• Oil – 3 tbsp
• Ghee – 2 tbsp
• Onions – 6–7 medium (sliced thin)
• Tomatoes – 2 (chopped)
• Tomato Puree – puree of 2–3 tomatoes
• Red Chilli Powder – 2 tsp
• Garam Masala – 1 tbsp
• Turmeric Powder – ½ tsp
• Chicken Masala – 2 tbsp
• Biryani Masala – 1 tbsp
• Salt – to taste
• Ghee – 2 tbsp (for dum)
• Biryani Masala – 1 tsp (on top)
• Mint & Coriander – chopped (for garnish)
• Fried Onions (Barista) – 2 tbsp
• Food Colour or Saffron – mixed in 2 tbsp warm milk (optional
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Tejal Khanvilkar