सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध कार्यक्रमांतून नवी मुंबईत मराठीचा जागर* *‘आंग्रु डुंग्रू’तून उजळला आगरी बोलीभाषेचा गोडवा

देशात 3 हजाराहून अधिक बोलीभाषा असून बोलीभाषांना इथल्या मातीचा गंध असतो, त्यामुळे बोलीभाषांच्या पायावरच प्रमाण भाषेची इमारत उभी असते असे मत व्यक्त करीत लेखक श्री.गजआनन म्हात्रे यांनी आपल्या सहका-यांसह ‘आंग्रु डुंग्रू’ या कार्यक्रमातून विविध उदाहरणे देत, लघुकथा, कविता, धवलेगीत सादर करीत आगरी भाषेतील सौंदर्यस्थळांचे नितांतसुंदर दर्शन घडविले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 28 डिसेंबरपर्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आगरी बोलीभाषेचे महत्व सांगणा-या ‘आंग्रु डुंग्रू’ या कार्यक्रमाला उपस्थितीतांची चांगली दाद मिळाली.

नवी मुंबईची ओळख ही आगरी-कोळ्यांची भूमी आहे. त्यामुळे इथली मूळ बोलीभाषा असणा-या आगरी भाषेतील गोडवा व तिचा इतिहास आणि परंपरेची ओळख व्हावी यादृष्टीने ‘आंग्रु डुंग्रू’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आगरी भाषेत विपुल लेखन करणारे साहित्यिक श्री.गजआनन म्हात्रे यांच्यासह गायिका श्रीम.संगीता पाटील व कवी श्री.अजय भोईर यांनी कविता, गीत, लघुकथा सादरीकरणातून आगरी साहित्याची नजाकत पेश केली.

अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त नामवंत गज़लकार डॉ.कैलास गायकवाड यांनी प्रत्येक भाषेची स्वत:ची अशी सौंदर्यस्थळे असतात असे सांगत आगरी बोलीभाषेचे महत्व विशद केले. याप्रसंगी मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव, कार्यकारी अभियंता श्री.प्रवीण गाडे व श्री. तानाजी शिंदे, सहा.आयुक्त श्री.अरूण पाटील आणि अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची रसिक उपस्थिती होती.

पंधरवड्यातील पुढील कार्यक्रम शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 11 वा. असून महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार आणि शासनाच्या लोकराज्य मासिकाचे माजी संपादक, लेखक तथा माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक श्री.सुरेश वांदिले यांचे ‘कार्यालयीन मराठी लेखन आणि मराठी युवकांसाठी करिअरच्या संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.  

मंगळवार, दि. 27 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 11 वा., कोल्हापूर जिल्ह्यात ‘वाचनकट्टा’ ही अभिनव संकल्पना शाळा-महाविद्यालयांत राबवून नव्या पिढीत वाचन प्रेरणा निर्माण करणारे ‘वाचनकट्टा’ या अभिनव संकल्पनेचे संस्थापक श्री.युवराज कदम यांचा शिक्षक, पालक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी नागरिक यांच्याशी  प्रेरणादायी संवाद - ‘वाचाल तर वाचाल’ संपन्न होणार आहे. या माध्यमातून विशेषत्वाने नवी मुंबईतील शाळा – महाविद्यालयांत वाचनसंस्कृती वाढीसाठीच्या  प्रयत्नांना दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बुधवार, दि. 28 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 11 वा., गज़लसम्राट सुरेश भट यांचा वारसा जपत मराठी गज़लचे दालन समृध्द करणारे सुप्रसिध्द गज़लकार श्री. आप्पा ठाकूर यांचा ‘गुंतलेले पाश’ हा मराठी गज़लांचा ह्रदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

त्याच दिवशी 28 जानेवारी रोजी, सायं. 4 वा. नमुंमपा अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता ’मला आवडलेले मराठी पुस्तक’ या विषयावर ‘मनोगत स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.  पुस्तक वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते, त्याला आकार येत असतो. अशी जगणे समृध्द करणारी पुस्तके इतरांनीही वाचावीत असे आपल्याला वाटत असते. त्या अनुषंगाने नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकाविषयी 5 मिनिटांच्या कालावधीत मनोगत व्यक्त करणे अपेक्षित असून ज्यामुळे ते पुस्तक मिळवून पूर्ण वाचण्याची उत्सुकता श्रोत्यांच्या मनात उत्पन्न होईल.

त्यानंतर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी व साहित्यप्रेमी नागरिक यांच्याकरिता ‘शब्दकोडे स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये उपस्थितांना उभे-आडवे चौकोन असणारे मराठी शब्दकोडे देण्यात येईल. ते सर्वात जलद सोडविणा-या पहिल्या 10 स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना स्पर्धेनंतर लगेच पारितोषिके प्रदान करण्यात येतील.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2026’ निमित्त आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, साहित्यप्रेमी नागरिक यांनी आपली नावे नमुंमपा मुख्यालय येथे तिस-या मजल्यावर माहिती व जनसंपर्क विभागात भ्रमणध्वनी क्र. 9930020814 / 7021780813 यावर दि. 27 जानेवारी 2026 या अंतिम दिनांकापर्यंत कार्यालयीन वेळेत नोंदवायची आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणेच नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवित असून नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये संपन्न होणा-या या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे. तरी नवी मुंबईकर मराठी भाषाप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमांत व स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभिजात मराठी भाषेचा जागर करावा असे आवाहन कार्यक्रमांचे मुख्य संयोजक अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट