अवकाळी पावसामुळे दीड हजार क्विंटल गहू भिजला ! शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
यवतमाळ : आर्णी कृषी उत्पन बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला तब्बल दीड हजार विवंटल गहू पावसात भिजल्याने संतप्त शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. व्यापाऱ्याऱ्यांचा माल शेडमध्ये सुरक्षित ठेवला जातो, मग शेतकऱ्यांचा माल उघड्यावर का टावाला, असा संतप्त सवाल करीत शेतकन्यांनी बाजार समिती सचिवांना धारेवर धरले.
"बाजार समीतीत अंदाजे तीन हजार क्विटंल गव्हाची आवक होती. त्यापैकी रोडमधील पंधरारी क्विंटल गव्हाचा लिलाव इझाला. उर्वरीत पंधराशे क्विंटल गहू हा शेडबाहेर होता तो अवकाळी पावसाने भिजला. भिजलेला हा गहू अड़ते पोत्यात भरुन ठेवणार आहेत. उर्वरीत गव्हाचा लिलाव बुधवारीकरण्यात येईल "
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातून दोन दिवस गव्हाचा लिलाव केला जातो. आज मंगळवारी जिलाव असल्याने परिसरातील शेतकऱ्याऱ्यांनी अंदाजे तीन हजार क्विंटल गहू विक्रीसाठी बाजार समितीत आणाला होता यातील काही गहू रोडमध्ये ठेवण्यात आला असला तरी मोठ्या प्रमाणातील गहू उधडवावरच पडून होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जऔरवार हजेरी लावली काही क्षणांतच शेतक-यांचा गहू भिजू लागला.
जीवाचे रान करून, कर्ज काढून आणि रक्तांचे
पाणी करून पिकाविलेला गहू डोळ्यांसमोर
पावसात भिजताना पाहून अनेक शेतकरी हतबल झाले. काहीँच्या डोळ्यात अबू तरळले. घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समितीचे सचिव विशाल राठोड यांना जाब विचारला, व्यापायांचा माल सुरक्षित शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा माल बाहेर ठेवून हा दुजाभाव का, आमच्या नुकसानौला जबाबदार कोण, असा सवाल शेतकन्यांनी केला
अवकाळी पावसामुळे बाजार समिती परिसरात एकच धावपळ उडाली. गहू
झाकण्यासाठी शेतकरी ताडपत्री, पोते आणि प्लास्टिक घेऊन धावताना दिसले. मात्र तोपर्यंत मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते, बंदा नापिकी, अतिवृष्टी आणि सततच्या आर्थिक संकटामुळे सेतकरी आधीच खचला आहे. त्यात आता बाजार समितीतील निष्काळजीपणामुळे विक्रीसाठी आणलेले धान्यही पावसात भिजल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं, असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav