‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

बदलापूरमधील पाहुणचाराने भारावले राज्यभरातील क्रीडापटू

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 

खेळाडूंच्या मिरवणूकीने व्हॉलीबॉल स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ

बदलापूरमधील पाहुणचाराने भारावले राज्यभरातील क्रीडापटू

बदलापूर :  ढोल-ताशाचा गजरात मराठमोळे फेटे परिधान करीत उत्साहपूर्ण मिरवणूकीने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा बदलापूर शहरात आज शानदार प्रारंभ झाला. डिजीटल वॉटर बॉटलने स्वागत, विद्युतप्रकाश झोतातील सामने, थेट प्रेक्षपणासह बदलापूरमधील पाहुणचाराने राज्यभरातील खेळाडू भारावून गेल्याचे दिसून आले. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित या स्‍पर्धेला आजपासून दिमाखदार सुरूवात झाली. हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर रंगलेल्या स्पर्धेचा प्रारंभ खेळाडूंच्या मिरवणूकीने करण्यात आला. बदलापूरमधील शिवशंभू वाद्य पथकाच्या जल्लोषात फेटे परिधान केलेल्या खेळाडूंची मिरवणूक लक्षवेधी ठरली. 

मिरवणूकीचे स्वागत कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे,  नगरसेवक किरण भोईर यांनी केले. यावेळी मुख्यधिकारी मारूती गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप व  ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.  बदलापूर जिमखानापासून सुरू झालेली मिरवणूक साई चौक, गणपती चौक मार्गे झेंडा चौकात आल्यानंतर क्रीडामय वातावरणात स्पर्धा स्थळी समाप्त झाली. दिड किमी अंतराच्या मिरवणूकीने  हेंद्रेपाडा परिसर क्रीडामय झाल्याची अनुभुती उपस्थितींना आली. 

दुपारच्या सत्रात स्पर्धेतील सहभागी अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर विभागातील पार्श्वभूमीवर प्रशिक्षक व व्यवस्थापकांची बैठक पार पडली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्‍या अध्यक्षतेखाली झालेल्‍या बैठकीत ,  नगरसेवक किरण भोईर , महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील उत्कृष्ट व्हॉलीबॉल प्रतिभेचा संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार असे किरण भोईर यांनी यावेळी सांगितले. 

आमदार  किसन कथोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून ही मानाची राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच अंबरनाथ बदलापूर परिसरात आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे प्रथमच स्थानिक खेळाडू, क्रीडाप्रेमी व युवकांना राज्यस्तरीय दर्जाच्या स्पर्धेची पार्वणी पहाण्यास मिळाली आहे. १३ ते १७ मे २०२६ कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्‍यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगणार आहे. 

चौकट

डिजीटल वॉटर बॉटलने भारावले खेळाडू

बदलापूरमधील राज्य व्हॉलीबॉल स्पर्धातील सहभागी सर्व ३२ संघाच्या ३८४ खेळाडूंनी स्‍मरणीय भेटवस्तू देत स्वागत करण्यात आले. डिजीटल  डिजीटल वॉटर बॉटलसह सॅक, कॅप आणि ओआरएसची पाकिटे खेळाडूंना देण्यात आली. तापमान दर्शविणाऱ्या डिजीटल वॉटर बॉटलने खेळाडू भारावून गेले होते. प्रथमच तापमान दर्शविणारी पाण्याची बाटली खेळाडूंच्या हाती आली होती. भर उन्हाळ्यात बदलापूरचे तापमान किती हे क्षणात खेळाडूंना समजून आले. तसेच उन्‍हापासून सरंक्षण होण्यासाठी ओआरएसची पाकिटे दिल्याने खेळाडू खुश असल्याचे दिसून येत होते.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट