बदलापूरमध्ये इनडोअर स्टेडियम उभे करणार ः आ. किसन कथोरे
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026
बदलापूर क्रीडामय, राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन
बदलापूरमध्ये इनडोअर स्टेडियम उभे करणार ः आ. किसन कथोरे
बदलापूर : ऑलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा ही ऐतिहासिक ठरणार सांगून शहरात इनडोअर स्टेडियम उभे करणार असल्याचे घोषणा आमदार किसन कथोरे यांनी आज येथे केली. क्रीडामय वातावरणात शासनाच्या राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला आजपासून दिमाखदार सुरूवात झाली. हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर रंगलेल्या स्पर्धेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यधिकारी मारूती गायकवाड, नगरसेवक किरण भोईर, माजी नगराध्यक्षा राजेंद्र घोरपडे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे संजय नाईक, निलेश जगताप व राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.
बदलापूरमधील व्हॉलीबॉल स्पर्धा ही ऐतिहासिक होईल असे सांगून श्रीमती रूचिता घोरपडे पुढे म्हणाल्या की, बदलापूर जिमखाना हे शहराचे वैभव आहे. शहरातील ५ क्रीडांगणे खेळाडूंसाठी उपलब्ध असून भविष्यात यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होतील. बदलापूरमधील स्पर्धा ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा असल्याचे वातावरण दिसून येत आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळातही करीअर होऊ शकते असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
खेळाडूंच्या मिरवणूकीने बदलापूरमधील राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा प्रारंभ झाला. यानंतर स्पर्धेचे शानदार उद्घाटन बदलापूर जिमखाना मैदानावरील भव्य मैदानात करण्यात आली. शाहिर नंदेश उमप यांच्या सांस्कृतिक मेजवानीसह जिम्नॉस्टिक्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
१३ ते १७ मे २०२६ कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे. ८ विभागातील ३८४ खेळाडू, ३२ मार्गदर्शक, ३२ व्यवस्थापक, एकूण ४४८ जणांचे पथक सहभागी झाले आहे. स्पर्धेत कोल्हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई व नाशिक या संघात चुरशीच्या लढती सुरू झाल्या आहेत. १८ व २१ वर्षांखालील युवकांचा व्हॉलीबॉलचा थरार प्रथमच बदलापूरमध्ये पहाण्यास मिळणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांनी मानले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times