‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुली त्वरित बंद करा.

                                            २१ तारखेला रायगड प्रेस क्लब ठिय्या आंदोलन 

                                                                                                    एस एम देशमुख राहणार उपस्थित
     
पाली  : अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुरू करण्यात आलेली टोलवसुली तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच महामार्गाचे काम पूर्ण होऊन अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टोलवसुली थांबवावी, अशी ठाम मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान २१ मे रोजी खारपाडा टोल नाक्यावर रायगड प्रेस क्लब च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.हे आंदोलन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तसेच रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकरआणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

    गेल्या आठवड्यात सुरू केलेला खारपाडा टोल नाका त्वरित बंद करावा अशी मागणी करित या संदर्भात सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकाऱ्यांना रायगड प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. महामार्गाचे अनेक भाग अद्याप अपूर्ण असून रस्त्याच्या कामांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून टोल आकारणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
      मात्र तरीही खारपाडा टोल नाका बंद करण्यात आला नाही त्यामुळे रायगड प्रेस क्लब च्या वतीने 21 मे रोजी खारपाडा टोल नाक्यावर या आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या आंदोलनाकरिता रायगड प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने तसेच जिल्ह्यातील सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट