‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सह्याद्री उद्ध्वस्त करणाऱ्या सहा धरण प्रकल्पांविरोधात कर्जतमध्ये धरणे आंदोलन. हजारो लोकांचा आंदोलनात सहभाग.

                             टोरेंट,पोशीर,शिलार धरण रद्द करा...धरणे आंदोलनातून निर्धार.

कर्जत :  कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट, पोशीर, शिलार तसेच कोंढाणे, पाली-भुतिवली धरण आणि टाटा जलविद्युत प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी, शेतकरी, आदिवासी आणि ग्रामस्थांनी सोमवारी (१८ मे) कर्जत येथील टिळक चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. “जल, जंगल आणि जमीन वाचवा” अशा घोषणा देत या सर्व प्रकल्पांना तातडीने स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनास दीड ते दोन हजार नागरिकांनी हजेरी लावली असुन कर्जत तालुक्यात या प्रकल्पांविषयी मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.दरम्यान शासनाने योग्य दखल न घेतल्यास पुढील काळात मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

कर्जत तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, जैवविविधतेने समृद्ध आणि उल्हास नदीच्या उगम क्षेत्रातील संवेदनशील भाग मानला जातो. युनेस्को (UNESCO) ने सह्याद्री पर्वतरांगांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशा संवेदनशील भागात अवघ्या १५ ते ३० किलोमीटर परिसरात सहा मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारले जात असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली.

टोरेंट पॉवरच्या साईडोंगर पंप्ड-स्टोरेज प्रकल्पासाठी सुमारे ९३२ एकर जमीन लागणार असून त्यातील त्यातील मोठा भाग वनक्षेत्राचा आहे. पोशीर आणि शिलार धरणांमुळे अनेक गावे, सुपीक शेती आणि आदिवासी वस्त्या बाधित होणार आहेत. कोंढाणे धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पाली-भुतिवली धरण ३१ वर्षांपासून अपूर्ण असून विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला.

“विकासाला आमचा विरोध नाही; मात्र शहरांना पाणी व वीज देण्यासाठी ग्रामीण आणि आदिवासी भागाचे अस्तित्व धोक्यात घालणे अन्यायकारक आहे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. भविष्यात मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला.

       आंदोलनाला पोशीर, शिलार, पाली भागातील नागरिक, मोरबे धरणग्रस्त तसेच अॅड.कैलास मोरे, बाबू घारे, सचिन गायकवाड, ठाकरे सेने चे नितीन सावंत, भाजपचे राजेश लाड व दिनेश रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर घारे, आदिवासी नेते मालू निरगुडे, जागृत कष्टकरी संघटनेच्या नॅन्सी गायकवाड तसेच पेण येथील ग्रामसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि मोठ्या संख्येने धरणग्रस्त नागरिक उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार धनंजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी तहसीलदारांना आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

रिपोर्टर

  • Sanket Jadhav
    Sanket Jadhav (reporter)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Sanket Jadhav

संबंधित पोस्ट